मुंबई | भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता आरोग्य विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद खंडाते, वैद्यकीय अधिकारी अर्चना मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच डॉ. सुनिता बडे यांची तातडीनं बदली करण्यात आली आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
9 जानेवारी रोजी भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला मध्यरात्री आग लागली होती. या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता.
या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली होती.
थोडक्यात बातम्या-
“सीरमच्या इमारतीला आग लागली की लावली?, या घटनेची चौकशी झाली पाहिजे”
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचे मृतदेह सापडलेत- राजेश टोपे
“अजित पवारांना मंत्र्यांना तंबी द्यावी लागत असेल, तर परिस्थिती गंभीर आहे”
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीबाबत मुक्ता टिळक यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…
“पवार साहेबांचं कुटुंब मोठं आहे त्यामुळे मुख्यमंत्री होण्यासाठी पाटलांना…”