बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात आरोग्य आणीबाणी, काय करत आहेत पुण्याचे कारभारी?, पुणेकरांचा सवाल

पुणे | कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुण्यातील नागरिकांची चिंता ही दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुण्यात आरोग्य आणीबाणी सदृश्य परिस्थिती दिसून येत आहे. त्यातच औषधे न मिळणं, चाचण्यांचे निकाल वेळेवर न येणं तसेच रुग्णांना वेळेवर उपचार न मिळणं. अशा नानाविध गोष्टी पुण्यात घडत असताना पुण्यातील राजकीय कारभारी मात्र पुण्यात बसून या परिस्थितीला हाताळताना दिसुन येत नाहीत.

पुण्यातील परिस्थिती गंभीर बनत असताना भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या हातात पुण्याचा कारभार देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहराला राजकीय नेतृत्व आहे की नाही? असा प्रश्न सामान्य पुणेकरांना पडला आहे. अधिकाऱ्यांच्या हातात कारभार दिल्याने सर्वजण आपल्याच धुंदीत काम करत आहे, कोणाचाही एकमेकाशी व्यवस्थित संवाद नसल्याचं दिसून येत आहे.

शासकीय यंत्रणा वेळेवर काम करत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी कोणी आहे की नाही असा प्रश्न जनमानसातून उपस्थित केला जात आहे. राज्यात राजकारण करण्यासाठी बराच काळ पडला आहे पण अशा गंभीर संकटाशी लढत असताना पालकमंत्री अजित पवार आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी यावेळी पुण्यात राहून या परिस्थितीचा आढावा घेणं गरजेचं असल्याचं आणि ती त्यांची जबाबदारी असल्याचं मत सामान्य पुणेकर सध्या व्यक्त करत आहेत.

पुण्याचे पालकमंत्री यांच्याकडे राज्याचं अर्थमंत्रीपद ही आहे, पण ते पुण्यात राहूनही राज्याची काळजी घेऊ शकतात. अशा भावना सध्या उपस्थित केल्या जात आहे. कोरोनाच्या संकटाशी लढत असताना पुण्याचे कारभारी मात्र आठवड्यातून एकच आढावा बैठक घेत असल्यानं नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटताना पाहायला मिळत आहे. आता तरी हे कारभारी पुण्यात तळ ठोकून येथील आरोग्याच्या समस्यांना सोडवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

शरद पवार यांच्यावरची दुसरी शस्त्रक्रिया यशस्वी; नवाब मलिक यांनी दिली माहिती

‘2 दिवसांनी लाॅकडाऊन लागणार आहे’; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचं व्यापाऱ्यांना महत्वाचं आवाहन

“तुमच्याप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शन पक्ष कार्यालयात लपवून ठेवलं नाही”

मोराच्या फार जवळ जाणं अंगलट, ‘या’ अभिनेत्रीच्या थेट अंगावरच मारली उडी!

“आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट; रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करणार का ?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More