बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Health| पोटात गॅस तयार झाल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय

मुंबई | आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःच्या शरिराकडे, आरोग्याकडे लक्ष देण्याचं विसरुन जातो. त्यामुळे अनेक समस्या उद्भवताना दिसतात. त्यातलीच एक समस्या म्हणजे पोटात गॅस (Gas) तयार होणं.

पोटात गॅस तयार होऊन बाहेर पडू न शकल्याने खूप त्रास होतो. जेव्हा पोटात गॅस तयार होतो आणि तो बाहेर पडू शकत नाही तेव्हा त्याला गॅस ट्रॅप म्हणतात. अन्न न पचल्यामुळे गॅस तयार होतो. तुमच्या पोटाभोवती गॅस दाब टाकते, ज्यामुळे तुम्हाला त्रास होतो आणि ढेकर येतो. परंतु जेव्हा जास्त प्रमाणात हवा तुमच्या शरीरात प्रवेश करते तेव्हा गॅस तयार होण्याच्ं प्रमाण वाढतं.

अन्न खाताना, बोलू नये याची काळजी घ्या. त्यामुळे हवा शरीरात जाण्यापासून रोखता येते. अशा गोष्टींचे सेवन अजिबात करू नका. दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनामुळे अनेकांना गॅस तयार होण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागते.

गॅस कमी करण्यासाठी आले आणि पुदिन्याचे पाणी खूप उपयुक्त ठरू शकते. बडीशेप आणि सफरचंद सायडर व्हिनेगर देखील खूप उपयुक्त आहे. कोमट पाणी किंवा हर्बल टी पिऊनही तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. योगासनांच्या काही आसनांमुळेही या समस्येपासून सुटका मिळू शकते.

थोडक्यात बातम्या – 

गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद, वाचा आकडेवारी

मशिदींवरील भोंगे उतरवणार का?; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले…

सोनिया गांधी अॅक्शन मोडवर; आगामी काळात मोठा निर्णय घेण्याची शक्यता

अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या नव्या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित, पाहा फोटो

“संजय राऊत यांना लवकर घोड्यावर बसवून तुरूंगात पाठवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More