Health Insurance Premium l तुमचा आरोग्य विमा असेल आणि त्याचे नूतनीकरण जवळ आले असेल तर ही बातमी तुच्यासाठी महत्वाची आहे. विमा नियामक IRDAI ने नुकतेच नियमांमध्ये काही बदल केले आहेत. यानंतर विमा क्षेत्रात काही बदल होऊ शकतात. त्याचा परिणाम भविष्यात विम्याच्या हप्त्यावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रीमियममध्ये 7.5% वरून 12.5% पर्यंत वाढ :
नवीन नियमानुसार, आता तुम्हाला विमा दाव्यासाठी जास्तीत जास्त तीन वर्षे वाट पाहावी लागणार आहे. पूर्वी ही मुदत चार वर्षांची होती. IRDAI ने केलेल्या बदलांनंतर विमा कंपन्या वेगवेगळ्या पॉलिसींच्या प्रीमियममध्ये बदल करण्याचा विचार करत आहेत. HDFC ERGO ने प्रीमियममधील बदलाबाबत ग्राहकांना आधीच माहिती दिली आहे.
HDFC ERGO कंपनीला प्रीमियम सरासरी 7.5% ते 12.5% वाढवावा लागेल. विमा कंपन्याही याबाबतची माहिती ई-मेलद्वारे ग्राहकांना देत आहेत. विमा कंपन्यांनी दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की, तुम्हाला चांगली योजना देण्यासाठी प्रीमियम दर किंचित वाढवाव्या लागतील.
Health Insurance Premium l विमा कंपन्या प्रीमियम 10% ते 15% वाढवू शकतात :
विमा योजनेच्या कामगिरीचा आढावा घेण्यासोबतच, कंपन्यांनी उपचार खर्चात झालेली वाढही विचारात घेतली आहे. तुमचे वय आणि शहर यावर अवलंबून असणार आहे. त्यानुसार प्रीमियम वाढ थोडी जास्त किंवा कमी असू शकते. तसेच ACKO जनरल इन्शुरन्स कंपनीचे उपाध्यक्ष रुपिंदरजीत सिंग म्हणाले की, काही विमा कंपन्या प्रीमियम 10% ते 15% वाढवू शकतात.
IRDAI ने नुकत्याच केलेल्या बदलांमध्ये आता हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी वयोमर्यादा नसल्याचाही नियम आहे. यापूर्वी ही मर्यादा 65 वर्षांची होती. ते म्हणाले की वाढत्या वयाबरोबर रोगाचा धोका वाढतो, त्यामुळे वयानुसार प्रीमियमची रक्कमही वाढवता येते. तसेच वयाशी संबंधित स्लॅब दर पाच वर्षांनी बदलल्यास प्रीमियम सरासरी 10% ते 20% पर्यंत वाढू शकतो.
News Title – Health Insurance Premium Change
महत्त्वाच्या बातम्या –
सुषमा अंधारेंचं हेलिकॅाप्टर कोसळलं, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ आला समोर
कोपर्डी बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट; …त्याला स्मशानभूमीत रात्रभर नग्न बसवले
मोठी दुर्घटना! हेलिकॉप्टर झालं क्रॅश; सुषमा अंधारे अन् पायलट…
काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात; या दोन गोष्टींमुळे गांधींचं पारडं जड राहणार