बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आरोग्यमंत्र्यांनी केली नवीन योजनेची घोषणा, काय आहे ‘मिशन कवच कुंडल’?

मुंबई | राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्यात आल्या असून 7 ऑक्टोबरपासून मंदिरे देखील उघडण्यात आली आहेत. अशातच आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मिशन कवच कुंडल योजनेची घोषणा केली आहे. नक्की काय आहेे ही योजना जाणून घेऊयात.

8 ऑक्टोबर 2021 ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत ‘मिशन कवच कुंडल’ ही योजना राबवायची असून या योजनेचं उद्दिष्ट देशात 15 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच दसऱ्याच्या दिवसापर्यंत 100 कोटी नागरिकांचं लसीकरण व्हावं असं केंद्र सरकारचं टार्गेट असल्याचं राजेश टोपेंंनी सांगितलं आहे.

लसीकरणानंतर कोविड होणार नाहीच, असं नाही मात्र दसरा आणि दिवाळी या सणादरम्यान त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुर्वी लस उपलब्ध नव्हती मात्र आता तशी परिस्थिती नसल्याने किमान 15 लाख लसीकरण दररोज झालं पाहिजे, असं राजेश टोपेंनी म्हटलं आहे. तसेच आता आपल्याकडे 75 लाख लसींचे डोस उपलब्ध आहेत, 25 लाख आणखी उपलब्ध होतील आणि अशाप्रकारे 1 कोटी लस या क्षणाला उपलब्ध आहेत, त्यामुळे सहा दिवसांत हा स्टॉक पूर्ण संपवण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागाला आम्ही दिलं आहे, असंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! पवारांशी संबंधित कारखाने आणि संचालकांच्या घरी आयकर विभागाच्या धाडी

‘येत्या 8 दिवसांमध्ये अटक केली नाही तर…’, राकेश टिकैत यांचा योगी सरकारला इशारा

‘या’ पदांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय; धनंजय मुंडेंनी दिली माहिती

भीषण अपघात! बस आणि ट्रकच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू, 27 जण रुग्णालयात

नरेंद्र मोदींनी वाहिली नटू काकांना श्रद्धांजली, जुना फोटो शेअर करत म्हणाले….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More