Top News फोटो फिचर

धक्कादायक! भाजप मंत्र्याच्या मुलाला रोखल्यामुळे पोलिस महिलेला द्यावा लागला राजीनामा

सुरत | रात्री १० पासून पहाटे ६ पर्यंत नागरिकांना बाहेर पडण्यास गुजरातमध्ये मनाई करण्यात आली आहे. तसेच मास्क वापरणंही बंधनकारक आहे. मात्र आरोग्यमंत्री कुमार कानाणी यांच्या मुलाला जनता कर्फ्यूचं उल्लंघन करण्याचा जाब विचारल्यानं एका पोलिस महिलेला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. सुरतमध्ये हा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

सुनीता यादव असं या पोलिस महिलेचं नाव असून सुरत शहरात बंदोबस्तासाठी तीची तैनाती करण्यात आली होती. यादरम्यान रात्रीच्या १० वाजण्याच्या सुमारास कुमार कानाणी यांचे काही समर्थक विनामास्क लावता गाडीतून फिरत होते. यावेळी सुनीताने या समर्थकांची गाडी जप्त करून चाव्या ताब्यात घेतल्या.

समर्थकांनी कुमार यांचा मुलगा प्रकाशला फोन करून तातडीनं येण्याची विनंती केली. प्रकाश याठिकाणी आपल्या समर्थकांना सोडवायला दाखल झाला, मात्र प्रकाशचं काहीच ऐकून न घेण्याचा पवित्रा पोलिस महिलेनं घेतला. अखेरीस संतापलेल्या प्रकाशनं आपल्या वडिलांना फोन लावला.

 

विशेष बाब म्हणजे या पोलिस महिलेनं आरोग्यमंत्र्यांनाही खडे बोल सुनावले. ‘जनता कर्फ्यू असताना तुमचा मुलगा विनामास्कचा गाडीतून फिरतो कसा? तुम्ही गाडीत नसताना तुमच्या नावाची नेमफ्लेट असलेली गाडी बाहेर फिरतेयच कशी?, नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत’ अशा शब्दात तीनं आरोग्यमंत्र्यांचाही चांगलाच समाचार घेतला.

यानंतर प्रकाशने बराच वेळ या पोलिस महिलेशी हुज्जत घातली. ‘मी मनात आणलं तर आयुष्यभर तूला इथेच उभं राहायला लावेन’ असा धमकीवजा इशराच त्यानं सुनीताला दिला. यावर सुनितानंही मी तुझ्या वडीलांची नोकर नसल्याचं ठणकावून सांगितलं. दोघांच्यातील वाद असाच सुरू राहीला.

 

सुनितानं तातडीनं पोलिस स्टेशनात फोन करून घडलेला प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला. मात्र वरिष्ठ म्हणाले की, या भागातील व्यापार किंवा दुकानं बंद करणं हे आपलं काम आहे. लोक कर्फ्यूमध्ये ये-जा करत आहेत का, हे पाहणं आपलं काम नसल्याचं त्यांनी सांगितलं. एवढंच नव्हे तर सुनीताला फटकारत घरी जाण्याचे आदेशही देण्यात आले.

 

आरोग्यमंत्र्याच्या समर्थकांकडून सुनीताचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. परिणामी सुनीतानं आपल्या पदाचा राजीनामा देऊ केला आहे. मात्र सोशल मिडीयावरून सुनिताच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे. एवढंच नव्हे तर ट्विटरवर सुनिताच्या समर्थनासाठी #ISupportSunitaYadav हा ट्रेंड देखील सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

ऐश्वर्याला कोरोना झाला हे कळताच विवेक ओबेरॉयचं ट्विट, म्हणतो…

सचिन पायलट यांनी भूमिका बदलली; भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत!

अभिनेता अभिषेक बच्चनला रूग्णालयातून डिस्चार्ज

पुण्यात 21 वर्षीय तरुणाच्या खुनाचा थरार; रस्त्यात गाठून गोळीबार त्यानंतर कोयत्याने सपासप वार

सचिन पायलट यांचा भाजपात प्रवेश, या काँग्रेस नेत्याचा गौप्यस्फोट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या