बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आरोग्यमंत्र्यांच्या ‘रक्तदानाच्या’ हाकेला युवक काँग्रेसचा प्रतिसाद; प्रदेशाध्यक्षांचं कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई |  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्तांचा तुटवडा जाणवतो आहे. कोरोनामुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीये. साहजिकच रक्तदान मोहिम असेल किंवा रक्तदान शिबिरं बंद आहेत. अशा हलाखीच्या परिस्थितीत राज्यातील जनतेने रक्तदान करावं, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. त्यांच्या आवाहनाला युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. (Health Minister Rajesh tope Appeal Please Blood Donate Youth Congress President Satyajeet Tambe Respond)

सत्यजित तांबे यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे की जेणेकरून रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासणार नाही. तसंच त्यांनी आपापल्या भागांमध्ये रक्तदान शिबिरांचे तातडीने आयोजन करावं, असंही आवाहन त्यांनी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना केलं आहे. (Health Minister Rajesh tope Appeal Please Blood Donate Youth Congress President Satyajeet Tambe Respond)

ब्लड बँकेमध्ये सध्या रक्त कमी आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर लोकांना रक्ताची गरज भासली तर आवश्यक परिस्थितीत रक्त कमी पडू नये किंवा जनतेला हाल सोसावे लागू नयेत म्हणून आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांना रक्तदानाचं आवाहन केलं आहे. तसंच रक्तदान केल्याने कोणताही धोका नाही, असंही त्यांनी नागरिकांना आश्वस्त केलं आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी 74 कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्रात होते. आज म्हणजे सोमवारी हा आखडा थेट 89 वर पोहचला आहे. यावरून कोरोनाचं संकट किती मोठं आहे याची कल्पना येत आहे. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळण्याचं आवाहन केलं जातं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

सरकार गंभीर होगी तो जनता गंभीर होगी; संजय राऊतांकडून मोदींची कानउघाडणी

“अभि नही तो कभी नही… उद्धवजी लॉकडाउनने भागेल असं वाटत नाही आता…”

महत्वाच्या बातम्या- 

“पाकिस्तानमध्ये आम्ही लॉकडाउन करु शकत नाही”

चीन अत्यंत गुप्त पद्धतीने वागतो; ट्रम्प चीनवर संतापले

मुंबईत कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; मृतांचा आकडा 3 वर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More