महाराष्ट्र मुंबई

कोरोना लसीसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली ‘ही’ महत्वपूर्ण माहिती

मुंबई | कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे प्राधान्यक्रम निश्चित झाले असून एकाच वेळी राज्याच्या 36 जिल्ह्यांमध्ये लस देण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आरोग्यमंत्री टोपे यांनी रक्तदान केलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पहिल्यांदा आरोग्य सेवकांना, नंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर 50 वर्षांवरील कोमोर्बिड लोकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. हे लसीकरण पूर्ण झाल्यावर सर्व 50 वर्षांवरील लोकांना लस देण्यात येणार आहे, असं राजेश टोपेंनी सांगितलं.

पहिल्या टप्प्यात 11 कोटींपैकी 3 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. यादी तयार करून मतदान केंद्राप्रमाणे लस दिली जाईल. लस दिल्यानंतर 30 मिनिटे तिथे बसवले जाईल. केंद्राकडून आलेली लस नवी मुंबईतील वाशी केंद्रात ठेवली जाणार असून तेथून वितरण केलं जाणार आहे. लसीकरणासाठी 16 हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आल्याचंही टोपे यांनी सांगितलं.

16 हजार 245 कर्मचाऱ्यांची लस टोचण्यासाठी को-विन पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. आतापर्यंत को-विन पोर्टलवर 90 हजारांहून अधिक लाभार्थींची नोंदणी झाल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘काँग्रेसला संपवण्याचा हा एक मोठा कट आहे’; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

लोकल ट्रेनचा प्रवास सर्वसामान्यांना थेट पुढच्या वर्षीच; मुंबई महापालिका आयुक्तांचे संकेत

शेतकऱ्यांचे आंदोलन भाजपच्या अंगलट, हरियाणातील खट्टर सरकार संकटात

शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाल्यास; संजय राऊतांची प्रतिक्रिया म्हणाले…

बिबट्याच्या शोधासाठी रोहित पवारांचा पुढाकार; बॅटरी आणि काठी घेऊन केली पाहणी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या