महाराष्ट्र सातारा

कोरोना नियंत्रणासाठी विरोधी पक्षांनी चांगल्या सूचना द्याव्यात, उगाच विरोध करु नये- राजेश टोपे

सातारा | राज्यात कोरोना व्हायरसचा प्रसार वाढत आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येतेय. मात्र राज्यातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी विरोधी पक्षांनी चांगल्या सूचना द्याव्यात. उगाच विरोध करु नये, असं मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलंय.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यवस्थितपणे काम सुरु आहे. मुंबई आणि मालेगावप्रमाणे राज्याच्या इतर भागातील कोरोनाचा प्रादुर्भावही नियंत्रणात येईल. सगळ्या गोष्टींची प्रोटोकॉलप्रमाणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न सुरुयेत. आम्ही मिशन मोडमध्ये आहोत, असं राजेश टोपे म्हणालेत.

वाढती रुग्णसंख्या हा जरी काळजीचा विषय असला तरी मृत्यूदर वाढू नये, याची काळजी सरकार घेतंय. त्यामुळे कोरोनाचं निदान लवकर होण्यासाठीच्या उपाययोजनांवर आम्ही भर देत आहोत. खासगी हॉस्पिटल रुग्ण बघत नसल्याच्या अनेकदा तक्रारी येतात. मात्र त्यांनी अँटीजेन टेस्ट किट ठेवाव्यात; पण त्यांनी रुग्ण तपासणी करावी. तसं न केल्यास रुग्णाच्या जीवाशी खेळणा-यांची जिल्हाधिका-यांनी गय करू नये, असंही राजेश टोपे यांनी सांगितलंय.

अनेक ठिकाणी रुग्णवाहिका कमी पडत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे राज्यात पाचशे नवीन रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिलीये.

महत्वाच्या बातम्या-

देश जेव्हा जेव्हा भावूक झाला, त्यावेळी फाईल्स गायब झाल्या- राहुल गांधी

पापड खाल्ल्यानं कोरोना बरा होतो असा दावा करणाऱ्या ‘या’ केंद्रीय मंत्र्यालाच कोरोनाची लागण

“ज्यांना मुंबई पोलिसांवर विश्वास नाही त्यांच्या हेतूवर शंका; पडद्यामागून कोण हालचाली करतंय हे मला माहितीये”

गुगल त्यांची सर्वात प्रसिद्ध असलेली ‘ही’ सुविधा बंद करणार…!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख होतोय पाहून शरद पवार संतापले अन्…..

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या