Top News महाराष्ट्र मुंबई

कोरोना रूग्णाला आता नातेवाईक भेटू शकणार, तशी सोय करण्याची आरोग्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी त्रिस्तरीय रुग्णालय असून लक्षणांनुसार रुग्णांना या रुग्णालयात दाखल केले जाते. रुग्णांवर होणारे उपचार, कोरोना रुग्णालयातील आरोग्य सुविधा याची देखरेख करण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती कोरोना रुग्णालयांना नियमित भेटी देईल. यासंदर्भात आरोग्य विभागाने नुकताच शासन निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील कोरोना रुग्णालयांमध्ये सीसीटिव्ही बसवावा. उपचार घेत असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना बोलता येईल यासाठी रुग्णालयात सोय करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

ज्या रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत अशा ठिकाणी जिल्हा प्रशासनाने सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत. रुग्णालयांच्या भेटी दरम्यान समितीला सीसीटिव्ही चित्रीकरण उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोना रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाला रुग्णालयाच्या आवारात प्रवेश द्यावा व नातलगाला थांबता येईल अशी जागा  रुग्णालयात तयार करावी. कोरोना रुग्णालयांनी मदत कक्ष तयार करावा जेथे रुग्णांचे नातेवाईक प्रत्यक्ष येऊन किंवा दूरध्वनीद्वारे उपचार घेत असलेल्या आप्ताची विचारपूस करू शकतील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

जिल्हा समितीचे कार्य-

• कोरोना रुग्णालयांना भेटी देऊन तेथील सुविधेची पाहणी करणे

• भेटी दरम्यान समिती सदस्य विलगीकरण कक्ष, आयसीयू यांना भेटी देऊन रुग्णाला देण्यात येत असलेल्या उपचाराची माहिती घेऊन कागदपत्रांची पाहणी करतील.

• अचानक भेटी देखील देण्याचे समितीला निर्देश आहेत.

• समितीने नियमितपणे मुख्य सचिवांना त्यांचा कार्य अहवाल पाठविणे.

ट्रेंडिंग बातम्या-

जवानांच्या हातात देश सुरक्षित, जगाला भारताच्या सामर्थ्याचे दर्शन, थेट सीमेवर जाऊन मोदींचं संबोधन

कोरोनाविरोधी लढ्यात पुणे महापालिकने टाकला टॉप गिअर, आता….

महत्वाच्या बातम्या-

…तर जुलैअखेर रूग्ण संख्या ४७ हजारांच्या पुढे जाईल, पुणे महापौरांच्या सरकारकडे या महत्त्वाच्या मागण्या

पोलिस अधिकाऱ्यांच्या विभागीय परीक्षेसंदर्भात गृहमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

शाहिद आफ्रिदीची भारतीय लष्करावर टीका, म्हणाला…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या