बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॉकडाऊनबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती हाती, ‘या’ तारखेनंतर राज्यात लॉकडाऊन?

मुंबई | कोरोनाने महाराष्ट्र उग्र रुप धारण केलं असून राज्यात लॉकडाऊन लागणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे, मात्र हा लॉकडाऊन नेमका लागणार तरी कधी?, असा प्रश्न राज्यातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन कधी लागणार यावर स्पष्ट शब्दात भाष्य केलं आहे.

राज्यातील लॉकडाऊनचा निर्णय लवकरच होणार असून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनची घोषणा करतील, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्समधील बैठक संपली त्यानंतर राजेश टोपे बोलत होते. यावेळी बोलताना १४ एप्रिलनंतरच्या कॅबिनेटमध्ये लॉकडाऊनचा निर्णय होईल, असं राजेश टापे यांनी जाहीर केलं आहे.

राज्यातील लॉकडाऊनसंदर्भात मुख्यमंत्री सध्या बैठकांवर बैठका घेत आहेत. सर्वपक्षियांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी टास्क फोर्ससोबत चर्चा केली, आता या बैठकीनंतर ते राज्यातील IAS अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. उद्या सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात देखील याच मुद्द्यावर बैठक होण्याची शक्यता आहे.

राज्यात लॉकडाऊन लावायचा झाल्यास त्याचं स्वरुप कसं असेल? किती दिवसांचा लॉकडाऊन लावायला हवा?, त्याची दाहकता किती ठेवायची?, प्रत्येक विभागाची तयारी तसेच आर्थिक गणितं, याबाबत टास्क फोर्ससोबतच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. लॉकडाऊन कडक लावला तर सामान्य जनतेचे हाल कसे होणार नाहीत, राज्यातील आरोग्य यंत्रणा आणि कर्मचारी यांचं नियोजन याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्याप्रमाणे १४ तारखेनंतर मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री स्वतः लॉकडाऊनची घोषणा करु शकतात. अर्थात नागरिकांना पूर्वतयारीसाठी पुरेसा वेळ दिला जाऊ शकतो, असं देखील सांगितलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

शरद पवारांच्या सातारच्या सभेची पुनरावृत्ती, फक्त यावेळी पावसात भिजले जयंत पाटील!

तृतीयपंथियांमध्ये खुनी खेळ, 55 लाखांची सुपारी देऊन दुसऱ्या गँगच्या म्होरक्याला मारलं!

राजेश टोपेंनी सांगितले टास्क फोर्सच्या बैठकीतील महत्वाचे मुद्दे; वाचा एका क्लिकवर

वृद्धाची हत्या करुन गावाबाहेर नेऊन पुरलं, मात्र कुत्र्यांनी…

पुण्यात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रूग्ण!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More