Top News महाराष्ट्र मुंबई

तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील, राजेश टोपेंचं भावनिक ट्विट

मुंबई |  राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई टोपे यांचे शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास दुख:द निधन झालं. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 74 वर्षाच्या होत्या.

महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात सापडलेला असताना दुसरीकडे आई शेवटच्या घटका मोजत मोजत होती पण राजेश टोपे कोरोनाविरूद्धच्या लढाईत मागे हटले नाहीत वा आपल्या कौटुंबिक दु:खाची त्यांनी चिंता केली नाही. मात्र आईच्या जाण्यानंतर त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. आपल्या आईबरोबरचा अखेरचा संवाद राजेश टोपेंनी ट्विट करून सांगितला आहे.

४ वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आशीर्वाद दिले. तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील, अशा भावना राजेश टोपेंनी व्यक्त केला आहे.

राजेश टोपे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, “ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. ४ वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती.दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आशीर्वाद दिले. तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील”

शारदाताई टोपे यांच्या त्यांच्या पार्थिवावर आज 2 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजता कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर ता. अंबड, जिल्हा जालना येथे करण्यात येणार आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

बारामतीत कोरोनाने हातपाय पसरले, अजित पवार ‘अ‌ॅक्शन मोड’मध्ये!

आरोग्यमंत्र्यांचा ‘उर्जास्त्रोत’ काळाच्या पडद्याआड, मुख्यमंत्र्यांना तीव्र दु:ख

राजेशभैय्या सारखा सुपुत्र महाराष्ट्राला देणाऱ्या शारदाताई आपल्यातून गेल्या, सुप्रिया सुळे हळहळल्या

आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या आईचे दीर्घ आजाराने निधन

“यूएई सुरक्षित नाही, IPL 2020 भारतातच खेळवा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या