बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…त्या दिवशी पुन्हा कडक लॉकडाऊन करणार’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

मुंबई | कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यााबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. यामध्ये हॉटेल चालकांनी रात्री दहावाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. त्यासोबतच आता कोरोनाची आकडेवारी पाहता राज्यात शिथिलता देण्यात आली आहे. यामध्ये दुकाने, मॉल्स, हॉटेल्स आणि लोकलसेवा सुरू केल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढण्याचाही धोका आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याच अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अलर्ट केलं आहे. तिसऱ्या लाटेचा विचार करता 200 मेट्रिक टन ऑक्सिजन वाढवणार आहे. 141 ऑक्सिजन प्लांटना मान्यता दिली आहे. 3800 मेट्रीक टन ऑक्सिजन लागू शकतो जर तिसऱ्या लाटेत 700 मेट्रीक टन ऑक्सिजन ज्यावेळी लागेल त्या दिवशी लॉकडाऊन लागेल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंदिर, सिनेमागृह, धार्मिक स्थळं बंद ठेवण्यात आल्याचं सांगितलं आहे. त्यासोबतच दोन डोस घेतलेल्यांनी आणि ज्यांनी पास काढला असेल त्यांनाच लोकलमधून प्रवास करता येणार आहे. जर बळजबरीने प्रवास केला तर 500 रूपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचं टोपेंनी सांगितलं.

दरम्यान, शाळा आणि कॉलेजच्या बाबतीत शिक्षण विभाग आणि टास्क फोर्स बाबात मुख्यमंत्र्यांची बैठक आहे त्यानंतर अंतिम निर्णय येणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

राज्यातील हॉटेल चालकांसाठी मोठी बातमी! रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी, पाळावे लागणार ‘हे’ नियम

‘भाजपचं मराठा आरक्षणावरील प्रेम पुतण्या मावशीसारखं’; शिवसेनेचा भाजपला टोला

“ठाकरेंचं मला सांगू नका माझा मुलगा पालिकेच्या शाळेत शिकत आहे”

“मंत्रालयातील सर्व बाटल्या संजय राऊतांनीच मोकळ्या केल्या, त्यामुळे…”; निलेश राणेंची जहरी टीका

“ज्यांनी आयुष्यात कधी बॅट पकडली नाही, त्यांची नावं स्टेडियमला दिली जाताहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More