महाराष्ट्र मुंबई

आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या आईचे दीर्घ आजाराने निधन

मुंबई | राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई टोपे यांचे आज निधन झालं. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. राजेश टोपे यांच्या आईला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्या 74 वर्षाच्या होत्या.

गेल्या दोन महिन्यांपासून पासून त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. एकीकडे आईची काळजी घेणं आणि दुसरीकडे कोरोनाची लढाई लढणं अशी दुहेरी कसरत गेल्या महिनाभरापासून राजेश टोपे यांची सुरू होती.

जालन्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या पार्थिवावर उद्या 2 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजता कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर ता. अंबड, जिल्हा जालना येथे करण्यात येणार आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या संकटकाळात संपूर्ण राज्याच्या आरोग्याची काळजी घेत असताना राजेश टोपे यांनी त्यांच्या मातोश्रींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यांनी मातोश्रींचीही तितक्याच तन्मयतेने काळजी घेतली. आज मी, राज्य मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि राज्यातील समस्त जनता श्री. राजेश टोपे कुटुंबियांच्या दुःखात त्यांच्यासोबत आहोत. स्वर्गीय शारदाताई यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

“यूएई सुरक्षित नाही, IPL 2020 भारतातच खेळवा”

पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

धक्कादायक! पुण्यात वॉर्डबॉयकडून कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग

अभिनेत्री कंगणा राणावतच्या घराबाहेर गोळीबार; पोलिसांची चौकशी सुरु

….म्हणून सदाभाऊ खोत पिसाळल्यासारखे वागत आहेत- राजू शेट्टी

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या