बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…नाहीतर मोठ्या प्रमाणात Omicron चा संसर्ग होऊ शकतो’; राजेश टोपेंचा गंभीर इशारा

मुंबई | कोरोना (Corona) महामारीनं सावट सुरु असतानाच कोरोनाच्या नवनवीन व्हेरिएंटनं डोकं वर काढल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता कोरोनाचा आणखी एक नवीन व्हेरिएंट आढळून आला आहे. यामुळे राज्यभर संसर्गाचा धोका आणखीनच वाढला आहे.

राज्यभरात ओमिक्राॅनचा (Omicron) संसर्ग हळूहळू वाढत चालला आहे. ओमिक्राॅनच्या रुग्णसंख्येतही वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत कर्नाटक, गुजरात, दिल्ली आणि महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता आरोग्य विभागाचं टेंशन आणखीच वाढलं आहे.

ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग पाहता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गंभीर इशारा दिला आहे. याविषयी बोलताना राजेश टोपे यांनी म्हटलं की, ओमिक्राॅनला (Omicron) आटोक्यात आणलं नाही तर मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ शकतो.

दरम्यान, कोरोना महामारीमध्ये नागरिकांना बराच कालावधी घरात बसून काढावा लागला. त्यामुळे पुन्हा अशी वेळ येऊ द्यायची नसेल तर नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचा इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“गिरीश कुबेर आपल्या पुस्तकातून शरद पवारांपेक्षा फडणवीस श्रेष्ठ असल्याचं मांडताना दिसतात”

‘तुम्ही भाजपत या आम्ही तुम्हाला पैसे अन् कॅबिनेट मंत्रिपद देऊ’; ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

आरोग्य विभागाचं टेंशन वाढलं; कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही…

ओमिक्रॉनचे रूग्ण सापडताच पुणे प्रशासन सतर्क; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

गिरीश कुबेरांवर झालेल्या शाईफेकीवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More