बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपने पोटदुखीचा इलाज करावा आणि भाजपशासित राज्यांच्या खोट्या आकडेवारीकडं लक्ष द्यावं”

मुंबई | मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे. त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे. हे प्रकार तत्काळ थांबवण्यात यावं, अशा मागणीचं पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं होतं.

देवेंद्र फडणवीसांनी पाठवलेल्या पत्रावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशणा साधला आहे. मुंबईची वाखाणणी सर्वोच्च न्यायालयाने केली याचा फडणवीसांना खरं तर आनंद वाटायला हवा होता. पण त्याची पोटदुखी व्हावी ही अपेक्षा नव्हती, असो!  खोट्या आकडेवारीचा मसीहा असलेल्या भाजपाचे सर्व मुख्यमंत्री आपल्या राज्यांमध्ये आकडे दडवतात आणि फडणवीस इथे चिंता व्यक्त करतात हे आश्चर्याचे आहे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

कोरोना व्यतिरिक्त मृत्यू करोना मृत्यूशी जोडले तरी हा दर ०.८% फारतर होईल. तो ही जगात कमी आहे. मुंबईचा आम्हाला अभिमान आहे. अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड ही महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर मेहनत घेत असल्याचं सचिन सावंत म्हणाले.

दरम्यान, दुसरी लाट सुरू झाली तेव्हा 10 फेब्रुवारी 2021 ला मुंबईत 3.13 लाख संकलीत रुग्ण आणि 11400 संकलीत मृत्यू होते. आज 6.71 लाख संकलीत रुग्ण व 13687 संकलीत मृत्यू आहेत. दुसऱ्या लाटेच्या 3 महिन्यात 2287 मृत्यू आहेत. हा दर केवळ 0.7% दर आहे जो जगात कमी आहे. दिल्लीत आठवड्याला 3000 मृत्यू होत असल्याची माहिती सावंत यांनी दिली.

 

थोडक्यात बातम्या- 

क्रीडा विश्वावर शोककळा! भारताच्या दोन सुवर्णपदक विजेत्या ऑलिम्पिकवीरांचं कोरोनामुळे निधन

अवघ्या 9 वर्षाच्या चिमुकलीने देश कोरोनामुक्त होण्यासाठी ठेवले पूर्ण रोजे

‘जिद्द म्हणजेच शरद पवार, दुसरं काही नाही’; राऊतांनी घेतली पवारांची भेट

कोरोना आकड्यांची बनवाबनवी तत्काळ थांबवा- देवेंद्र फडणवीस

‘माझ्या सूनेचे क्रिकेटर इरफान पठाणसोबत अनैतिक संबंध’; निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More