मुंबई | 14 एप्रिलला लॉकडाऊन मागे घ्यायचा की नाही हा केंद्राचा निर्णय आहे. जर मागे घेतला तर सर्वजण घराबाहेर पडतील आणि 21 दिवसांच्या लॉकडाऊनवर पाणी फिरेल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
आपण 14 तारखेपर्यंत वाट बघू, स्वत:ला शिस्त लावू, लॉकडाऊन संपवायचा असेल तर आपण खबरदारी घेण्याची गरज आहे. लॉकडाऊनबाबत 14 एप्रिलला पंतप्रधान जाहीर करतील, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
14 एप्रिल नंतर परिस्थिती नॉरमल होईल असं समजू नका. लोकांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे. तज्ज्ञांची मतं घेऊनच त्याबाबत निर्णय घेतला जाईल. अजून 15 दिवस आहेत. आताच लॉकडाऊन वाढेल की नाही सांगता येणार नाही, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
काही राष्ट्रांमध्ये लॉकडाऊन 50 ते 60 दिवसांपर्यंत वाढवला आहे. याचा अर्थ आपल्या देशात तो वाढणार असं मी म्हणणार नाही, तो मला अधिकारही नाही, असंही राजेश टोपेे म्हणाले.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाच्या संकटात अजय देवगननं सिनेकामगारांना दिली मोठी रक्कम
क्वारंटाईन टाईम म्हणत ‘या’ अभिनेता-अभिनेत्रीनं बेडरुमधले फोटो सोशल मीडियावर टाकले
महत्वाच्या बातम्या-
पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी; परदेशात प्रवास न केलेल्या महिलेचा मृत्यू
4 आठवड्यात कमी होईल कोरोनाचा प्रभाव; चीनी संशोधकाचा दावा
‘गो कोरोना, कोरोना गो’ नंतर रामदास आठवले यांची नवी घोषणा
Comments are closed.