बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताचं टेन्शन वाढलं! ओमिक्राॅनचं शतक पुर्ण, केंद्र सरकारने दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

नवी दिल्ली | कोरोना (Corona) महामारीमुळे अनेकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशातच कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्राॅनने (Omicron) संपुर्ण जगाचं टेन्शन वाढवलं आहे. ओमिक्राॅनने जगातील अनेक देशांची आरोग्य यंत्रणा मोडकळीस आणली आहे. अशातच आता भारतात देखील ओमिकाॅनने शतक पुर्ण केलं आहे.

देशातील 11 राज्यांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची म्हणजेच ओमिक्रॉनची 101 रूग्ण सापडली आहेत. त्यामुळे आता आरोग्य मंत्रालयानकडून लोकांना सतर्क राहण्यास आणि अनावश्यक प्रवास, सामूहिक मेळावे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचबरोबर लसीकरणावर भर देण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.

ओमिक्रॉन प्रकाराच्या प्रसाराबाबत अनावश्यक प्रवास, मोठ्या प्रमाणात एकत्र येणे टाळण्याची वेळ आहे आणि मोठ्या प्रमाणावर नवीन वर्ष साजरे करण्याची गरज नाही. कोविड प्रकरणाचा संसर्ग दर पाच टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये किमान दोन आठवडे पाच टक्क्यांपेक्षा कमी होईपर्यंत प्रतिबंधात्मक उपायांची खात्री करणे आवश्यक असल्याचं आयसीएमआरचे डीजी डॉ. बलराम भार्गव यांनी म्हणालं आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतील डेल्टा व्हेरियंटपेक्षा ओमिक्रॉन वेगाने पसरत आहे, जेथे डेल्टा कमी पसरल्याचं निदर्शनात आलं आहे. Omicron डेल्टा व्हेरियंटला मागे टाकेल अशी शक्यता आहे. त्यामुळे जिथे सामुदायिक संक्रमण होते तिथे ओमिक्रॉन संसर्ग डेल्टा पॅटर्नला मागे टाकेल, अशी भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

झुनझुनवालांना जोर का झटका! ‘या’ शेअर्समुळे फक्त 10 मिनिटात गमावले 318 कोटी

‘भाजप आणि ममता बॅनर्जी मिळून…’; RSS च्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

जय शहांचा ‘तो’ फोटो तुफान व्हायरल; दिग्गजांनी केली सडकून टीका

नाथाभाऊंनी केला भाजपचा करेक्ट कार्यक्रम; तब्बल 21 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

“कदाचित मी पहिलाच मंत्री असेल ज्याने…”, नितीन गडकरींनी सांगितला मजेशीर किस्सा

“हिंदवी स्वराज्य आणि हिंदूवी स्वराज्य या शब्दांचा अर्थ भाजपला कळत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More