Health Tips | मनुष्याला त्याच्या रंगापेक्षा त्याचं हास्य अधिक सुंदर बनवत असते. यासाठी आपल्या दातांची आणि तोंडाची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक असते. तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी (Health Tips) आपले दात ब्रश करणे आवश्यक आहे.
मात्र, बऱ्याचदा आपले दात खराब होण्यामागे आपण वापरत असलेले टूथब्रश असतात. बहुतांश लोक ठराविक वेळेनंतर टूथब्रश बदलण्यास विसरतात. यामुळे दातांचे आरोग्य बिघडते. एकच टूथब्रश सलग अनेक महिने वापरल्याने केवळ दातच नाही तर हिरड्या आणि तोंडही खराब होते.
त्यामुळे आपण आपला टूथब्रश कमीतकमी 3-4 महिन्यांनी बदलणे गरजेचे आहे. पण त्याआधीच जर तुमचा टूथब्रश खराब होऊ लागला असेल तर, तो बदलणे आवश्यक असते. जरी तुम्ही टूथब्रश दोन महिने वापरला असला तरी तो खराब होत असेल तर तो बदलायला हवा.
टूथब्रश कधी बदलायला हवा?
बरेच जण टूथब्रश अगदी खराब झाल्याशिवाय बदलतच नाहीत. मात्र असे करणे (Health Tips) अत्यंत चूक आहे. प्रत्येक 3 ते 4 महिन्यांनी आपला टूथब्रश बदलायला हवा. अशाने आपल्या तोंडाचे आरोग्य उत्तम राहते. तसेच तोंडाच्या अनेक आजारांपासून आराम मिळतो.
टूथब्रश खराब झाला हे कसे ओळखाल?
टूथब्रशचे ब्रिस्टल तुटू लागले, वळू लागले, बाजूला पडू (Health Tips) लागले तर तेव्हा टूथब्रश ताबडतोब बदलून घ्यावा किंवा जर तुमचा टूथब्रश जास्त हार्ड असेल आणि तो सतत हिरड्यांना इजा देत असेल तर तो बदलून घ्यावा. तसेच जर तुम्ही बराच काळ आजारी असाल आणि आता आजारातून बरे झाला असाल, तर या आजारात वापरलेला टूथब्रश पुन्हा वापरू नये.
टूथब्रश स्वच्छ कसा कराल?
टूथब्रश निर्जंतुकीकरण करण्यासाठी उकळत्या पाण्यात सुमारे 5 मिनिटे ठेवून द्यावे. नंतर पाण्यातून काढून ते स्वच्छ कापडाने पुसून ठेवावे. तसेच बेकिंग सोडा आणि पाण्याच्या मिश्रणात (Health Tips) टूथब्रश टाकूनही तुम्ही स्वच्छ करू शकता.
News Title – Health Tips for good teeth
महत्त्वाच्या बातम्या-
‘भावी मुख्यमंत्री संघर्ष कन्या’, पंकजा मुंडेंच्या वाढदिवशी झळकले बॅनर
सर्वसामान्यांच्या खिशाला झळ! कांदा-टोमॅटोनंतर आता बटाटा तेजीत
‘काळ आला होता पण वेळ नाही’, पुरात अडकलेल्या तरुणाला बचाव पथकाने सुखरूप काढले बाहेर
उद्धव ठाकरेंचा भाजपला दे धक्का! माजी आमदाराने बांधलं शिवबंधन