देश

पोर्तुगालमध्ये Pfizer ची लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू!

लिस्बन | पोर्तुगालमध्ये एका आरोग्य कर्मचारी महिलेचा Pfizer कंपनीची कोरोनावरील लस घेतल्यानंतर मृत्यू झाला आहे.  सोनिया असेवेडो असं या महिलेचं नाव होतं. ती 41 वर्षांची होती. लस घेतल्यानंतर तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारे साईड इफेक्ट्स दिसून आले नव्हते. अचानक तिचा मृत्यू झाला.

डेली मेलने यबाबतचं वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार सोनिया या पोर्तो शहरातील पोर्तुगीज इन्स्टिटयूट ऑफ ऑन्कोलॉजीमध्ये कार्यरत होत्या. त्यांना यापूर्वी कोणताही आजार झाला नव्हता.

ब्रिटन आणि फिनलँडमध्येदेखील अमेरिकन औषध कंपनी फायझरच्या कोरोनावरील लसीमुळे साईड इफेक्ट्स झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

दरम्यान, सोनिया यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केलं गेलं असून तिच्या मृत्यूचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

थोडक्यात  बातम्या-

“अंबानी, अदानी हे दोन उद्योगसमूह शेतीच्या ठेकेदारीत घुसतील आणि भविष्यात शेतकरी भिकेला लागेल”

“पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग दाखवू”

MPSC, UPSC परीक्षांसदर्भात महत्त्वाची बातमी, वाचा सविस्तर माहिती

“मतदारवर्ग घसरल्याने शिवसेनेला खमंग ढोकळ्याची आठवण”

रोटन टाटा असा उल्लेख करत सुब्रमण्यम स्वामी यांची रतन टाटांवर टीका, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या