Top News देश

“…अन्यथा तुम्हाला कोरोना झाल्यास सरकार उपचारांसाठी येणारा खर्च देणार नाही”

Photo Courtesy- Pixabay

चंदीगड | कोरोना लस घ्या अन्यथा कोरोना झाल्यास राज्य सरकार तुमच्या उपचाराचा खर्च करणार नसल्याचं पंजाब सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे. पंजाब सरकारच्या या धोरणामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधित लस घेणं बंधनकारक झालं आहे.

कोरोना प्रतिबंधित लस घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना 19 फेब्रुवारीची मूदत देण्यात आली होती आता ती मुदत वाढवून 25 फेब्रुवारी करण्यात आली आहे. यानंतरही कोणी आरोग्य कर्मचारी लस घ्यायची राहिल्यास आणि त्याला कोरोना झाल्यास सरकार त्याच्यावर कोणताही खर्च करणार नाही, असं पंजाब सरकारने म्हटलंय.

लस न घेतलेल्या व्यक्तीला कोरोना झाल्यामुळे कोणतीही सुट्टी मिळणार नाही. पंजाब सरकारने हा निर्णय घेण्यामागे महत्वाचं कारण आहे. पंजाबचे आरोग्यमंत्री बलबिंदर सिंह सिद्धू यांनी एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

पंजाबमध्ये तीन आठवड्यापूर्वी कोरोना संक्रमित रूग्णांचा आकडा दोन हजार होता, आता तो आकडा वाढून तिन हजारच्याही पूढे गेल्याचं दिसून येत आहे. संपुर्ण देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे आणि कोरोना पुन्हा डोकं वर काढताना पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या-

तृणमूल काँग्रेसला धक्का! कोळसा चोरी प्रकरणी सीबीआयने केली ‘ही’ मोठी कारवा

धक्कादायक! पुण्यात Tiktok स्टार समीर गायकवाडने केली आत्महत्या

“भाजपतून राष्ट्रवादीत येणाऱ्यांना पदे देऊ नका, पवारांच्या त्यागाची किंमत त्यांना समजलीच पाहिजे”

‘…नाहीतर कोरोना पुन्हा येईल’; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा इशारा

येत्या काळात भाजप ‘आरक्षण’ बाजूला काढेल- जितेंद्र आव्हाड

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या