बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना रूग्णांचा तणाव कमी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी करतायेत ‘हे’ काम, पाहा व्हिडीओ

मुंबई| कोरोनाच्या दुस-या लाटेने महारौद्ररूप धारण केले आहे. अशा स्थितीत देशातील आरोग्यव्यवस्थाही कमी पडत आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

अशातच कोरोना रुग्णांचा तणाव कमी करणं हा त्यांच्यावरील उपचारातला एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळं आरोग्य कर्मचारी कोरोना रूग्णांचे मनोरंजन करताना पहायला मिळतात. अशा अनेक घटनांचे व्हिडिओ आतापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. असाच आणखी एक व्हिडिओ सध्या समोर येत आहे.

देशातील आरोग्य कर्मचारी न थकता आपली सेवा देत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांचे हेच समर्पण सध्याच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये कोरोना रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी रुग्णालयांमधील डॉक्टर आणि नर्स गाणं गात आणि डान्स करत रुग्णांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचे मानसिक स्वास्थ जपण्यासाठी हे डॉक्टर्स भक्तीगीतांचासुद्धा उपयोग करत आहेत.

दरम्यान, यातील एका व्हिडीओमध्ये दिसतंय कोविड सेंटरमध्ये भक्तीगीत सुरु असल्याचा आवाज येत आहे. रुग्ण भक्तीगीत ऐकून देवाचा जप करताना दिसत आहेत. त्यामुळं रुग्णालयातील वातावरण एकदम ताजेतवाणं आणि प्रसन्न वाटत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला सलाम ठोकला आहे. त्यांचं कौतुक केलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Anu Lapsiwala (@__anu__lapsiwala)

थोडक्यात बातम्या – 

अचानक फ्लाईटमध्ये कपलने सरू केलंं किसिंग त्यानंतर एअरहोस्टेसने केलं असं काही की….

हृदयद्रावक! माहेरचा निरोप घेणाऱ्या नववधूने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घेतला जगाचा निरोप

“मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केल्यास कोणताही दुष्परिणाम होणार नाही”

मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद; जाणून घ्या

कौतुकास्पद! 5 रूपयांसाठीच्या अपमानामुळे आज ‘ती’ करतीय लोखोंचा व्यवसाय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More