बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हेल्थकार्ड सिस्टीम ही नव्या आरोग्य व्यवस्थेची सुरवात ठरेल” – डॉ. राजेंद्र विखे पाटील

अहमदनगर | प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या नवीन डेटा सेंटरचे व नवीन सर्वसमावेशक संगणक प्रणालीचे उद्घाटन आज प्रवरा मेडिकल ट्रस्टचे चेअरमन डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर आयोजित कार्यक्रमात डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, प्रवरा मेडिकल ट्रस्ट सुमारे 10 कोटी रुपये खर्च करून नव्या संगणक प्रणालीच्या साहाय्याने सुरु केलेली हेल्थकार्ड सिस्टीम ही नव्या आरोग्य व्यवस्थेची सुरूवात ठरेल. या नव्या संगणक प्रणालीमुळे प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि प्रवरा आरोग्य विद्यापीठ यांचे काम अधिक पारदर्शक होण्याबरोबर अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे.

या नवीन प्रणालीच्या आधारे येत्या 15 ऑगस्टपासून सुरु करण्यात येणारी हेल्थकार्ड ही सिस्टीम प्रवरा परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची आरोग्य पत्रिका असेल. ही नवीन प्रणाली म्हणजे प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या नव्या मोलाच्या प्रवासाची सुरूवात आहे. असा मला विश्वास आहे, असं मत विखे पाटील यांनी कार्यक्रमात व्यक्त केलं आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ राजवीर भलवार यांनी केले. तर सूत्रसंचालन संगणक विभाग प्रमुख श्री. महेश तांबे यांनी केले. यावेळी सौ. सुवर्णाताई विखे पाटील, ध्रुव विखे पाटील, प्रवरा आरोग्य विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. एस. एन. जंगले, अधिष्ठाता डॉ. राजवीर भलवार, डॉ. हेमंत कुमार, कुलसचिव डॉ. संपत वाळुंज, श्री.पंजाबराव आहेर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या – 

पुणे मनपात खळबळजनक प्रकार! मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

आनंदाची बातमी! सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी

छत्रपती शाहू महाराज आणि अजित पवारांच्या लक्षवेधी भेटीनंतर शाहू महाराज म्हणाले…

राज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त ‘या’ शहरात मिळतंय 53 रुपयांत एक लिटर पेट्रोल

“हिला कोणीतरी आवरा”, योगा व्हिडीओंमुळे राखी झाली ट्रोल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More