बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोण म्हणतं चाट खाऊन वजन कमी करता येत नाही?, मग हे ‘चाट’ एकदा खाच

मुंबई | वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय निवडतात. वजन नियंत्रणात ठेवायचं म्हणून अगदी कडक डाएट करतात. डाएटचे जेवण अनेकदा बेचव आणि आळणी लागतं. मात्र, क्वचित लोकांना माहिती कि चटपटीत चाट खाऊनही वजन नियंत्रणात ठेवता येतं.

कडधान्याचे फायदे तर सर्वांनाच माहिती आहेत. प्रथिन्यांनी समृद्ध असलेल्या कडधान्याच्या चाटमुळे वजन नियंत्रणात ठेवायला मदत होते. कडधान्य, कॉर्न, कांदा, टोमॅटो मिक्स करून त्यात मीठ, लिंबू, मिरपूड घालायची. हे चाट सकाळी नाश्त्यात किंवा संध्याकाळी स्नॅक्समध्येही खाऊ शकता.

अंड्यात मुबलक प्रमाणात प्रथिने असतात, शिवाय आवश्यक जीवनसत्त्वे आणि लोह असते. त्यामुळेच फिटनेसच्या बाबतीत अंडी महत्त्वपूर्ण मानली जातात. अंड्याच्या चाटसाठी उकडलेल्या अंड्यात टोमॅटो चटणी, चिंचेची चटणी आणि लिंबाचा रस मिक्स करायचा.

दरम्यान, डाएट करत असाल आणि चटपटीत खायची इच्छा झाली तर तुम्ही हे चाट बनवू शकता. मात्र, कोणतेही घरघुती उपचार, औषधं किंवा डाएट सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

थोडक्यात बातम्या-

“समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफजलखानी वार सुरू”

“ईडीला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर या शिवाजी पार्कात”

‘या’ भागात पुन्हा हलक्या सरींची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

Nawab Malik Arrested | “ही कायदेशीर आणि राजकीय लढाई आम्ही लढू”

अटकेनंतर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया, म्हणाले “मला जबरदस्तीने…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More