उन्हाळ्यात चमचमीत खाण्यापेक्षा ‘हे’ पदार्थ खा; मिळतील आश्चर्यकारक फायदे

Healthy Food | उन्हाळ्यात कोणते पदार्थ खावे याबाबत अनेकांना फार कमी माहिती आहे. उन्हामुळे अनेकदा पोटाची समस्या निर्माण होताना दिसत आहे. अनेकदा उन्हाळ्यात पाणी पिऊनच पोट गच्च होतं. जेवणाची इच्छा होत नाही. अनेकदा पोटदुखीचा देखील त्रास होतो. यावेळी अशा काही वस्तू आपल्यासोबत ठेवाव्यात की त्या सहज आपण खाऊ शकतो. आरोग्याची कोणतीही समस्या निर्माण होणार नाही. (Healthy Food)

पदार्थ खराब होऊ नये यासाठी पदार्थ बंद डब्यात ठेवले जातात. उन्हाळ्यात  बंद पॅक केलेले पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवास करत असताना तुम्हाला सोबत अन्न पदार्थ कोणते न्यावेत, याबाबत असे काही पर्याय  सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा प्रवास चांगला तर होईलच शिवाय तुमची भूकही मिटेल. (Healthy Food)

केळीच्या चिप्सचे सेवन करा

केळीच्या चिप्सचे सेवन करा. बटाट्याच्या चिप्सचे सेवन करू नका. केळीच्या चिप्सला मसालेदार, तसेच तेलाचा मर्यादित वापर केला जातो. तर बटाट्याच्या वेफर्सला अधिक तेलाचा वापर केला जातो. यामुळे प्रवासावेळी केळीच्या वेफर्सचे सेवन करावं. यामुळे पोट खराब होणार नाही. (Healthy Food)

भाजलेला मखाना

थोडक्यात भूक भागवण्यासाठी मखना हा महत्त्वाचा पर्याय आहे. हे सर्वोत्तम स्नॅक्स आहे जे मुलांनाही आवडतं. ते कुरकुरीत तुपात तळून घ्या. काळे मीठ, तिखट, आमोचर आणि जिरे पावडर चवीनुसार टाकावं. प्रवासासाठी निरोगी स्नॅक्स तयार करा. (Healthy Food)

प्रवास करताना सुका मेवा आपल्यासोबत प्रवासात ठेवावा. आरोग्याचा विचार करता सेवनामध्ये काजू, बदाम, मनुका, खजूर, अंजीर, खरबूज, भाजलेले हरभरे आणि शेंगदाणे देखील पॅक करू शकता. पोट भरल्यानंतर पोटाला कोणताही आजार होत नाही.

News Title – Healthy Food In Summer During Travelling

महत्त्वाच्या बातम्या

बॉलीवुडचा ‘किंग खान’ दिवसाला किती कमावतो?; आकडा वाचून हैराण व्हाल

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाने घातला धुमाकूळ; पाच जणांचा मृत्यू

राज ठाकरे धुमाकूळ घालणार? पदवीधर निवडणुकीत मनसेची उडी

विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! दहावीचा निकाल थोड्याच वेळात पाहता येणार या वेबसाईटवर

मुंबईकरांनो सावधान! या तारखेपासून पाणी कपात होणार, पाणी जपून वापरा