नवी दिल्ली | कोरोना लस निरोगी तरुणांपर्यंत पोहचायला 2022 पर्यंत वेळ लागू शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलंय.
कोरोनाची लस आणि आरोग्य संस्थेत काम करणाऱ्या तसेच फ्रेंटलाइनवर काम करणाऱ्या कामगारांना ही लस पहिल्यांदा दिली जाणार आहे. त्यानंतर लस कोणत्या टप्प्यातील रुग्णांना आणि नागरिकांना द्यायची याचे प्राधान्यक्रम ठरवावे लागतील, असं सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या.
सर्वात जास्त धोका असणाऱ्यांना सर्वप्रथम लस पोहोचवणं हे प्राधान्य असेल असं सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
नितीश कुमार यांनी माझ्या वडिलांचा अपमान केला; चिराग पासवान यांचा आरोप
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात – अशोक चव्हाण
बॉलिवूडला संपवण्याचं कारस्थान सहन करणार नाही- उद्धव ठाकरे