बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच आज सुटणार?, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

नवी दिल्ली | गेल्या महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक ऐतिहासिक गोष्टी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंडखोर आमदारांना सोबत घेत भाजपसोबत(BJP) सत्ता स्थापन केली, त्यावेळीपासून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात सतत टोलेबाजी सुरू असते. त्यात खरी शिवसेना कोणाची हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. या वादासह पाच याचिकांवर बुधवारी सुनावणी होणार होती, परंतु ही सुनावणी आज होणार आहे.

बुधवारी पार पडलेल्या सुनावणीत, शिवसेनेचे नेते सुभाष देसाई(Subhsh Desai) यांनी एक प्रतिज्ञापत्र सादर केले, त्यात शिंदे गटातील नेत्यांनी अडीच वर्षे सोयी-सुविधांचा फायदा घेतला, त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर नाराजी व्यक्त केली नाही. कार्यकर्ते नाराज आहेत, मतदार नाराज आहेत, असे त्यांनी याआधी कधी सांगतले नाही. मग ही नाराजी आता का ?, असा प्रश्न त्यांनी या प्रतिज्ञापत्रातून उपस्थित केला आहे.

बुधवारी न्यायालयात अनेक युक्तिवाद करण्यात आले. मुख्यमंत्री, सरकार बेकायदेशीर आहेत. तसेच शिंदे गटाला विलीनिकरणाशिवाय पर्याय नाही, असा शिवसेनेच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला. तर शिंदेंच्या वकिलांनी पक्षांतर केले नाही, त्यामुळे पक्षांतर कायदा लागू होत नाही, असा युक्तिवाद न्यायालयात केला.

शिवसेना आणि शिंदे गट या दोन्ही गटासाठी ही सुनावणी महत्वाची आहे. निकाल शिवसेनेच्या बाजूने लागला तर राज्यातील सरकार कोसळू शकतं, जर निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला तर ठाकरे घराण्याकडचा शिवसेनापक्ष जाऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील ही सुनावणी ऐतिहासिक ठरू शकते.

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुणे दौऱ्यावर पुणेकरांची नाराजी

उदय सामंतांवरील हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे आक्रमक, म्हणाले…

प्रणिती शिंदेंची मोदी सरकारवर सडकून टीका, म्हणाल्या…

“गद्दारांची गाडी फोडणार त्याचा शिवसेना प्रमुखांच्या हस्ते सत्कार करणार”

संजय राऊतांची एकूण संपत्ती किती?, स्वत:च केला होता खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More