इस्लामाबाद | पाकिस्तानची (Pakistan) सध्याची परिस्थिती कोणापासून लपलेली नाही. पीठ, डाळ, तांदूळ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. याचं कारण म्हणजे या सर्व वस्तूंचा येथे मोठा तुटवडा आहे.
सोन्याचा भाव (Gold Rate) 16 लाख रुपये प्रति 100 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर 10 तोळा सोन्याचा भाव 18,45,000 रुपयांवर आला आहे.
पाकिस्तान ऑब्झर्व्हरच्या अहवालानुसार, गेल्या तीन सत्रांमध्ये 7,300 रुपयांच्या वाढीनंतर सोमवारी पाकिस्तानमध्ये सोन्याच्या दरात प्रति तोला 2,800 रुपयांची घसरण झाली आहे.
ऑल पाकिस्तान सराफा जेम्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी सोन्याचा भाव प्रति तोला 2,800 रुपयांनी घसरून 184,500 रुपयांवर बंद झाला. त्याचप्रमाणे दहा ग्रॅमच्या आधारे सोन्याचा भावही 2,401 रुपयांनी घसरून 158,179 रुपयांवर बंद झाला.
पाकिस्तानमध्ये महागाईच्या वाढत्या दरामुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी कमी झाली असली तरी दुसरीकडे सोन्याच्या बिस्किटांमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवलं जात आहे. त्यामुळे अलिकडच्या काही महिन्यांत देशात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली असून सोन्याचा भाव प्रति तोळा एक लाख 65 हजार रुपयांवर पोहोचला आहे, जी देशाच्या इतिहासातील सोन्याच्या किंमतीची सर्वोच्च पातळी आहे. .
दरम्यान, पाकिस्तानमधील लोक गव्हाची पोती घेऊन जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग करताना दिसले होते. नॅशनल इक्वॅलिटी पार्टी जम्मू-काश्मीर गिलगिट बाल्टिस्तान आणि लडाखचे अध्यक्ष प्राध्यापक सज्जाद राजा यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आणि लिहिलं की ही मोटरसायकल रॅली नाही, तर पाकिस्तानमधील लोक पीठाने भरलेल्या ट्रकचा पाठलाग करत आहेत. तेथील लोकांची पिठासाठी मारामर सुरू असल्याचं दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-