काळजी घ्या! हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका वाढतो, जाणून घ्या कारणे

Heart Attack Risk | हिवाळा (Winter) सुरू होताच हृदयविकाराशी संबंधित समस्यांमध्ये (Heart Attack Risk ) वाढ होताना दिसते. हिवाळ्यात, रक्तवाहिन्यांमध्ये (Blood Vessels) अडथळा (Blockage) निर्माण झाल्याने कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढण्याची शक्यता अधिक असते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका (Risk) वाढतो. या हंगामात (Season) हृदयाला अधिक काम करावे लागते कारण या काळात हृदयाला पुरेसा ऑक्सिजन (Oxygen) मिळत नाही. अशा परिस्थितीत हृदयाला अधिक मेहनत करावी लागते.

हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याची समस्या का वाढते? यापासून कसा बचाव (Prevention) करावा आणि हृदयाशी संबंधित आजार (Disease) असल्यास काय करावे? यासारख्या अनेक प्रश्नांवर नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूटचे (National Heart Institute) सीईओ (CEO) डॉ. ओपी यादव (Dr. OP Yadav) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊयात.

हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका का वाढतो?

डॉ. ओपी यादव यांनी सांगितले की, हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. त्याची अनेक कारणे असू शकतात. थंडीच्या काळात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात (Contract), ज्यामुळे रक्त योग्य प्रकारे पंप (Pump) होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. याशिवाय, या हंगामात रक्त घट्ट (Thick) होते आणि ते छातीपर्यंत योग्य प्रकारे पोहोचू शकत नाही. अशा परिस्थितीत देखील हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

शारीरिक हालचालींचा अभाव

थंडीच्या दिवसांमध्ये लोक शारीरिक हालचाली (Physical Activity) खूप कमी करतात. थंडीमुळे बहुतेक लोक घरातच राहणे पसंत करतात. इतकेच नाही तर सकाळचा व्यायाम (Morning Walk) करणे देखील टाळतात. अशा परिस्थितीत आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी (Red Blood Cells – RBC) एकमेकांशी जोडल्या जातात, ज्यामुळे हृदयातील रक्ताभिसरण (Blood Circulation) कमी होते. परिणामी, हृदयविकाराशी संबंधित घटनांमध्ये वाढ होते. (Heart Attack Risk )

अयोग्य आहार

हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढवण्यात आपला आहार (Diet) महत्त्वाची भूमिका बजावतो. असंतुलित आहार देखील हृदयविकाराच्या झटक्याला आमंत्रण देतो. थंडीच्या दिवसात लोक सहसा सॅच्युरेटेड फॅट (Saturated Fat), ट्रान्स फॅट (Trans Fat), रिफाइंड (Refined) आणि सोडियमयुक्त (Sodium) प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ (Processed Food) जास्त प्रमाणात खाणे पसंत करतात. हे सर्व पदार्थ आपल्या शरीरासाठी आणि हृदयासाठी हानिकारक (Harmful) असतात, परंतु हिवाळ्यात आपण ते चवीने खातो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराचा धोका वाढतो. थंडीच्या दिवसात अयोग्य आहारामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.

कोणत्या हंगामात वाढतो धोका?

डॉ. ओपी यादव यांच्या मते, कोणत्याही हंगामात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असू शकतो. परंतु हिवाळा आणि उन्हाळ्यात (Summer) याचे प्रमाण वाढते. कारण थंडीत रक्त पातळ (Thin) होण्याऐवजी घट्ट होते. दुसरीकडे, उन्हाळ्यात शरीरातून घाम (Sweat) निघून गेल्याने रक्त घट्ट होते, ज्यामुळे रक्ताचा योग्य प्रवाह हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही. अशा परिस्थितीत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. थंडीच्या काळात संतुलित आहार, योग्य जीवनशैली (Lifestyle) आणि योग (Yoga), प्राणायाम (Pranayama) आणि ध्यान (Meditation) करून हृदयविकारासह इतर आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. (Heart Attack Risk )

Title : Heart Attack Risk Increases in Winter Causes and Prevention