Heart Care | बदलत्या जीवनशैलीचा आपल्या शरीरावर खूप परिणाम होत असतो. जेवणाच्या पद्धती, वेळ त्याचबरोबर कामाचा ताण-तणाव यामुळे मानसिक आरोग्य तर बिघडतेच शिवाय शारीरिक आरोग्य देखील खराब होते. यामुळे वेगवेगळे आजार डोके वर काढते. सध्या तर हृदयासंबंधी आजारांचे प्रमाण अधिकच वाढत चालले आहे. अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांना देखील हृदयासंबंधी आजाराचे निदान होत आहे. ही चिंता (Heart Care ) वाढवणारी बाब आहे.
यामुळे आपल्या आरोग्यावर लक्ष दिले नाही तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. अगदी आपण काय खातो, किती खातो त्याची गुणवत्ता तसेच जेवण झाल्यानंतर आपल्या शरीराची होणारी हालचाल हे सर्व घटक शरीरावर थेट परिणाम करत असतात. तुम्ही जर दिवसभर ऑफिसमध्ये लॅपटॉप समोर बसून काम करत असाल तर शरीराची जवळपास हालचाल होतच नाही. बैठे काम केल्याने मग अनेक आजार उद्भवतात. त्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
आजकालच्या पिढीला हाय ब्लड प्रेशर, मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयविकार या संबंधी आजरांनी ग्रासले आहे. हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होणे हे हृदयविकाराचे प्रमुख (Heart Care ) कारण आहे. ते वेळेवर ओळखले गेले नाहीत, तसेच त्यावर उपचार केले नाहीत तर गंभीर परिणाम होऊ शकतात.
हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होत असल्याची सुरुवातीची लक्षणे कशी ओळखावी?, यसंबंधी या लेखात माहिती दिली आहे. ही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नये, त्यावर तातडीने उपचार घेणे गरजेचे आहेत. अन्यथा ते खूप महागात पडण्याची शक्यता असते.
हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणार्या धमन्या फॅटी एथेरोस्क्लेरोसिसमुळे अरुंद किंवा बंद होऊ शकतात. त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. या आजारात या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल, फॅटी डिपॉझिट्स आणि इतर पदार्थांचा साठा होतो. यामुळे हृदयासंबंधी आजार उद्भवू शकतात.
हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे आल्याची प्राथमिक लक्षणे-
छातीत वेदना किंवा अस्वस्थता : सुरुवातीला छातीत वेदना होणे किंवा अस्वस्थ वाटणे, अशी लक्षणे दिसू लागतात. छातीवर दाब आल्यासारखा वाटतो, दाबल्यासारखे वाटते (Heart Care ) किंवा छातीच्या मध्यभागी किंवा डावी बाजू भरगच्च झाल्यासारखे वाटू शकते.
श्वास घेण्यास त्रास होणे : रोजची कामे करताना किंवा झोपताना श्वास घेण्यास त्रास होणे, हे हृदयाकडे कमी प्रमाणात रक्तपुरवठा होत असल्याचे लक्षण असू शकते.
खूप जास्त थकवा : अचानकपणे थकवा जाणवणे, दैनंदिन कामांमध्येसुद्धा थकवा जाणवणे ही लक्षणे असू शकतात. यामागे शारीरिक क्षमतेत घट होणे आणि शारीरिक कमकुवतपणा हे कारण देखील असू शकते.
मळमळ किंवा अपचन : काही व्यक्तींना मळमळ, अपचन किंवा पोटात वरच्या भागात अस्वस्थता जाणवते. काही वेळा ही लक्षणे हृदयाशी संबंधित नसून पचनाक्रियेशी (Heart Care ) असल्याचे वाटू शकते.
थंडगार घाम येणे : विनाकारण थंडगार घाम येणे, छातीमध्ये दुखणे तसेच अस्वस्थ वाटणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे ही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (Heart Care )
News Title – Heart Care
महत्त्वाच्या बातम्या-
“रवी राणासारखे छपरी लोक महायुतीत असतील तर आम्ही बाहेर पडू”
…यापुढे वीज बिल नाही; जाणून घ्या थकबाकी बिलाचं काय होणार?
आज नीरज चोप्रा खेळणार फायनल सामना; कुठे, किती वाजता पाहता येणार सामना?
राज्यात पावसाचा ब्रेक! ‘या’ जिल्ह्यांत मात्र धो-धो बरसणार, यलो अलर्ट जारी
बाजारात आलाय सर्वात बेस्ट स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत