शाकाहारी लोकांना Heart attack चा धोका सर्वात कमी?, नवीन संशोधन समोर

Heart Disease | आपण खात असलेल्या अन्न पदार्थांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे आहार नेहमी पौष्टिक आणि सकस असावा.आता थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. या काळात तर आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. सध्या तरुणांमध्ये सुद्धा हृदयविकाराचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. यामागे वेगवेगळी कारणे समोर येत आहेत. कामाचा ताण-तणाव, अनियमित जेवण, व्यायामाचा अभाव आणि बाहेरचे फास्ट फूड यामुळे आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी समोर येत आहेत. (Heart Disease)

अशात एक नवीन संशोधन समोर आले आहे. मांसाहारी आहार घेणाऱ्या लोकांपेक्षा शाकाहारी आहार घेणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराने मृत्यूचा धोका हा 32 टक्के कमी असल्याचं समोर आलं आहे.कारण शाकाहारी जेवणातील फायबर आणि मिनरल्स हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले पोषण देतात.

काय सांगतो नवीन दावा?

मांसाहारी पदार्थांच्या तुलनेत शाकाहारी आहाराच्या सेवनाने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, असं समोर आलंय. शाकाहारी आहारात अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण देखील भरपूर प्रमाणात असते. एका नवीन संशोधनानुसार, पूर्णपणे शाकाहारी आहार घेतल्यास मांसाहार या आहाराच्या तुलनेत हृदयविकाराचा झटका आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.

शाकाहारी आहारामुळे हृदयाचे स्नायू मजबूत राहतात. यामुळे तीव्र जळजळ कमी होते आणि हृदयरोगांपासून बचाव होतो. इंग्लंड आणि स्कॉटलंडमधील सुमारे 45 हजार लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर आधारित वर्षभराच्या संशोधनानंतर हा दावा करण्यात आला आहे. (Heart Disease)

हृदयरोगाची लक्षणे कोणती?

सतत थकवा जाणवणे
श्वास घेण्यास त्रास
छातीत दुखणे
अचानक घाम येणे
उलटी सारखं वाटणे
कमी किंवा उच्च रक्तदाब (Heart Disease)

हृदयरोग कसा टाळणार?

योग्य आणि पौष्टिक आहार घ्या
खाण्यापिण्याची काळजी घ्या
मानसिक ताण-तणाव घेऊ नका
दर 6 महिन्यांनी संबंधित चाचणी करा
आपल्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या (Heart Disease)

News Title –  Heart Disease New claim in front 

महत्त्वाच्या बातम्या-

वर्षाच्या शेवटच्या महिन्यात काय आहेत सोने-चांदीचे दर?, जाणून घ्या एका क्लिकवर

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पवना धरणात घडली दुःखद घटना

पिंपरी-चिंचवडमधील तब्बल ‘एवढ्या’ लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या!

ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट, ‘या’ जिल्ह्यांत धो-धो बरसणार!

हिवाळ्यात हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? अशाप्रकारे काळजी घ्या