देश

कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना होतोय ‘हा’ आजार; वेळीच व्हा सावध

नवी दिल्ली | कोरोनामुळे देशभरात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे जगभरात देखील कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने एक कोटीचा टप्पा पार केला आहे.

जगभरात कोरोनावर संशोधन करण्यात येत आहे. नव्या रिसर्चमधून एक धक्कादायक माहिती समोर आली असून चिंता वाढवली आहे. देशात तब्बल दहा लाख तर जगात एक कोटी लोकांनी आतापर्यंत कोरोनाची लढाई जिंकली आहे. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र आता कोरोनावर मात केलेल्या जवळपास 80% रुग्णांना हृदयाचा आजार होत असल्याची चिंताजनक माहिती एका रिसर्चमधून समोर आली आहे.

जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनने याबाबतचा रिसर्च केला आहे. यामध्ये यावर्षी एप्रिल ते जून 2020 दरम्यान कोरोनातून बरे झालेल्या, मात केलेल्या 100 लोकांचा अभ्यास करण्यात आला. रिसर्चमध्ये असे दिसून आलं आहे की 100 पैकी 78 रुग्णांना हृदयाच्या अनेक समस्या होत्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचं वृत्त दिलंय.

60 लोकांच्या हृदयाला सूज दिसून आली आहे. संशोधकांच्या मते सुरुवातीला अशा गंभीर समस्या रुग्णांना नव्हत्या, त्यांच्या अशी कोणतीही लक्षणं आधी आढळली नव्हती.

महत्वाच्या बातम्या-

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर माजी केंद्रिय मंत्री जयराम नरेश यांचा सवाल

पुण्यातील कर्वेनगरमध्ये नवरा-बायकोची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये दिलं ‘हे’ कारण

विवस्त्रावस्थेत आढळलेल्या पुण्यातील तरुणीच्या हत्येचं गूढ उकललं; पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी!

बच्चा, कामयाब नहीं काबिल बनो, कामयाबी अपनेआप कदम चूमती है!- अमोल कोल्हे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या