बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ह्रदयस्पर्शी! ‘या’ लहानग्याची पंतप्रधान मोदींना आर्त हाक; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 71वा वाढदिवस आहे. त्यांना देशातील राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातून स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. मात्र, आसामच्या एका 4 वर्षांच्या चिमुकल्यानं मोदींना शुभेच्छा देत एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये लहान मुलगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनंती करताना दिसत आहे.

रिजवान शाहीद लश्कर असं या चार वर्षाच्या मुलाचं नाव आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकला आपल्या वडिलांसाठी न्यायाची मागणी करताना दिसत आहे. आपल्या वडिलांच्या हत्येची चौकशीची मागणी करताना या लहान मुलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांचदेखील नाव घेतलं आहे. चार वर्षापुर्वी व्हिडीओमधील मुलाच्या  वडिलांची डोक्यात रॉड घालून हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांचं कुटूंबीय न्यायाची मागणी करत आहे.

मी ज्यावेळेस तीन महिन्यांचा होतो त्यावेळेस 11 जणांनी मिळून माझ्या वडिलांची हत्या केली. माझ्या वडिलांना न्याय द्या, अशी मागणी या चिमुरड्याने केली आहे. त्याबरोबरचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या प्रकरणात लक्ष द्यावं, अशी मागणी देखील हा लहान मुलगा करताना दिसत आहे.

दरम्यान, रिजवानच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली होती. तर 2 आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळालं नाही. रिजवानच्या आईने आम्ही असुरक्षित आहोत, तसेच हत्या करणारे आरोपी घराच्या आसपास येतात, असं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी लहानग्याने आर्त हाक दिल्यानं आता यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

पुणे बंद! उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

…अन् भर कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारींनी काढला महिलेचा मास्क; पाहा व्हिडीओ

अभिनेता मनोज वाजपेयींचे वडिल रूग्णालयात दाखल, प्रकृतीबाबतची माहिती आली समोर

‘2024 ला पण तुम्हीच पंतप्रधान…’; अभिनेत्री कंगणा राणावतच्या मोदींना खास शुभेच्छा

‘…म्हणून मुख्यमंत्र्यांनी ते वक्तव्य केलं’; नाना पटोलेंची भाजपवर जहरी टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More