“ह्रदयाचे ठोके वाढले आहेत, आशा आहे की..”; अमिताभ बच्चन यांचं ट्विट चर्चेत
मुंबई | बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. अमिताभ बच्चन यांचं वय जवळपास 80च्या घरात असताना अभिनयात सक्रिय आहेत. देशभरात अमिताभ बच्चन यांचे अनेक चाहते आहेत. त्यातच आता अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत चाहत्यांना माहिती दिली आहे.
ह्रदयाचे ठोके वाढले आहेत. काळजी वाटत आहे. आशा आहे की, सर्वकाही ठीक होईल, असं अमिताभ बच्चन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. हात जोडणारा इमोजी आणि ह्रदयाचा एक इमोजीही त्यांनी शेअर केला आहे. महानायकाचं हे ट्विट पाहून चाहते चिंतेत आहेत. हे ट्विट करण्यामागचं कारण ते विचारत आहेत.
अमिताभ यांच्या ट्विटनंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे. लवकर बरे व्हा, काळजी घ्या, अशा कमेंट्स येत आहेत. अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली आहे की दुसरे काही कारण आहे, यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अमिताभ बच्चन लवकरच नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपटात दिसणार आहेत.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी चेहरे या चित्रपटात भूमिका केली होती. झुंड या चित्रपटातील मुख्य भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारली आहे. निवृत्त क्रिडाशिक्षक विजय बारसे यांची भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारली आहे. अमिताभ बच्चन यांच्या ट्विटमुळे प्रकृती स्वास्थ्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
पाहा ट्विट-
T 4205 – heart pumping .. concerned .. and the hope ..🙏❤️
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 27, 2022
थोडक्यात बातम्या-
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार की आणखी चिघळणार?, दोन्ही देशात चर्चेला सुरुवात
संभाजीराजेंना पाठींबा देण्यासाठी 12 वर्षीय मुलाने अडवला राऊतांचा ताफा
अजित पवारांकडून पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव, म्हणाले…
नवाब मलिकांच्या अडचणींत वाढ! रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच…
“मोदींनी तात्काळ राज्यपालांची उचलबांगडी करावी, अन्यथा….”
Comments are closed.