बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ह्रदयद्रावक! तीन वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावर कोसळली क्राँक्रीट लिफ्ट, जागीच मृत्यू

गोंदिया | गोंदिया येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. या घटनेमध्ये अवघ्या तीन वर्षांच्या मुलाच्या अंगावर क्राँक्रीट लिफ्ट कोसळल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित मुलाचे नाव जिगर पंकज तिडके असं आहे.

गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यात मुंडीकोटा जमानगर या ठिकाणी मोरेश्वर तिडके रहिवासी आहेत. मोरेश्वर तिडके यांच्या घराच्या स्लॅबचं काम सुरु होतं. या घराचं स्लॅबचे काम करण्यासाठी लाखेगाव याठिकाणी मन्सूर खोब्रागडे यांच्या मालकीचे लिफ्ट बोलवण्यात आली होती.

हे बांधकाम सुरु असलेल्या घराशेजारील झोपडीत 4 लहान मुलं राहत होती. यादरम्यान घराच्या छताचे काम सुरु असताना क्राँकीट वर नेण्यासाठी लिफ्ट बनवण्यात आली होती. मात्र ही लिफ्ट नीट बांधली नसल्याने ती लिफ्ट क्राँकीटसह झोपडीवर कोसळली.

दरम्यान, यावेळी घरात असलेले तीन बालकं थोडक्यात वाचली तर घराच्या बाहेर असलेल्या चिमुकला त्यात दबला गेला. गंभीर दुखापत झाल्याने त्याला तात्काळ तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

थोडक्यात बातम्या-

मोदी पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी नाहीतर भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आलेत- भाजप

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चर्चा तापली, सभागृहात विरोधकांचा जोरदार गोंधळ

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी विरोधकांमध्ये धक्काबुक्की; कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब

“भागवतांनी हिंदू- मुस्लीम ऐक्यावर बोलणं म्हणजे RSSने सरड्याप्रमाणे रंग बदलणं”

‘सगळं कामकाज बाजूला ठेवा पण MPSC वर चर्चा घ्या’; फडणवीस आक्रमक

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More