बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ह्रदयद्रावक! दीड फुटांची सळई छातीतून आरपार गेलेल्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई | मुंबई येथील विक्रोळी परिसरात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली होती. बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या वरच्या मजल्यावरून सुमारे दीड फूट लांबीची सळई ही खालच्या मजल्यावर येऊन पडली. यावेळी काम करत असलेल्या एका 29 वर्षीय कामगार महिलेच्या छातीत ती सळई आरपार घुसली. यानंतर महिलेची शस्त्रक्रीया करण्यात आली जी यशस्वी झाली आहे.

शनिवारी 19 जूनला विक्रोळी पूर्व परिसरात निर्माणाधीन इमारतीचे बांधकाम सुरू होते. या ठिकाणी एक पती-पत्नी कामगार म्हणून कार्यरत आहेत. यातील कामगार असणारी महिला खालच्या मजल्यावर आपलं बांधकाम विषयक काम करत होती. हे काम करत असतानाच साधारणपणे दुपारी 3 वाजताच्या सुमारास वरच्या मजल्यावरून एक सळई पडली. ही सळई दुर्दैवाने महिलेच्या छातीत आरपार घुसली.

अत्यंत गंभीर अवस्थेतील महिलेला तात्काळ महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सदर महिलेची गंभीर परिस्थिती बघून तिला शीव परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्याच लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास हलविण्यात आले. तेथे या महिलेच्या छातीत सळई आरपार घुसलेली असल्यामुळे शस्त्रक्रिया गृहातील ‘बेड’वर झोपवणेही शक्य होत नव्हते.

दरम्यान, बऱ्याच प्रयत्नानंतर या महिलेस एका कुशीवर झोपवून ही शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यात आली. साधारणपणे सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास सुरू झालेली ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया रात्री 10 वाजेपर्यंत म्हणजेच सलग 3 तास सुरू होती. अत्यंत अवघड शस्त्रक्रिया पूर्ण झाली आणि महिलेच्या छातीतून सळई यशस्वीपणे काढण्यात येऊन महिलेचे प्राण वाचविण्यात आले.

थोडक्यात बातम्या- 

“मंत्रिपदासाठी लाचार झालेला नेता आम्हाला नको”; रामदास आठवलेंना घरचा आहेर

हरियाणा आणि पंजाबमधील वातावरण तापलं, बॅरिकेड तोडत शेतकऱ्यांची राजभवनाकडे कूच

कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरीएंटची लक्षणं नेमकी कोणती? काय काळजी घ्यावी?, वाचा सविस्तर

शेतकऱ्याच्या 14 वर्षीय लेकीची गगनभरारी, अमेरिकेत केलं यशस्वी विमानउड्डाण

‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’; चक्का जाम आंदोलनावरुन जयंत पाटलांचा सणसणीत टोला

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More