बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हृदयद्रावक! कोरोनामुळे आईचा मृत्यू झाल्यावर मुलानं अंत्यसंस्कार करण्यास दिला नकार

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा कहर अगदी भयावह करणारा आहे. कोरोनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहे. अनेक बालके अनाथ झाली आहेत, अनेकांनी आपले प्राण गमावले. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला असून आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. अशीच एक हृदयद्रावक घटना सध्या समोर येत आहे.

कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर मुलानं देखील अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नातेवाईकांनी मृतदेहांकडे पाठ फिरवल्याच्या कित्येक घटना समोर आल्या आहेत. अशा मृतदेहांवर जनसेवा दल अंत्यसंस्कार करत आहेत.

जनसेवा दलाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी फोन केला असता त्यांनी नकार दिला आहे. काही लोक तर कोरोना झाल्यानंतर रुग्णांना रुग्णालयात दाखल करतात. पण नंतर पाहत देखील नाहीत. एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या मुलाला फोन करण्यात आला. मात्र, त्याने मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला.

दरम्यान, कोरोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक वाढत चाललाय. देशभरातील अनेक कोरोना योद्धे गेल्या वर्षभरापासून कोरोनापासून आपल्याला वाचवण्यासाठी लढत आहेत. या लढाईत अनेक योद्ध्यांना कोरोनानं ग्रासलं देखील. तसेच अनेक डॉक्टर्स, नर्सेस यांनी या लढाईत आपले प्राण देखील गमावले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होणार, राकेश टिकैत यांचं शेतकऱ्यांना आवाहन

‘बाळासाहेबांबत राज ठाकरेंना किती आदर आहे हे समोर आलं’; शिवसेनेची राज ठाकरेंवर टीका

“शरद पवार भाडोत्री चाणक्याची भेट घेतात याचा अर्थ त्यांच्या राजकारणाचा अस्त”

कोरोनामुळे यंदाही अमरनाथ यात्रा रद्द; ‘या’ दिवसापासून घेता येणार ऑनलाईन दर्शन

बच्चू कडूंचा गनिमी कावा! वेशांतर करुन शासकीय कार्यालयात गेले अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More