बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ह्दयद्रावक घटना! बापाच्या कष्टाचं मुलानं चीज केलं इंजिनिअर झाला, लग्नही ठरलं अन्…

सोलापूर | वडिलांनी पेपर विकून आपल्या मुलाला इंजिनीअर केलं. मुलानंही प्रामाणिकपणे अभ्यास केला आणि आपली चमक दाखवली. त्याला मोठ्या कंपनीत नोकरीही मिळाली. कुटुंब आनंदात होतं आणि यातच मुलाला कोरोनाची लागण झाली. उपचार केले मात्र, कोरोनारुपी काळाने त्याला हिरावून नेलं. आयुष्यभर केलेले कष्ट, पाहिलेली स्वप्नं क्षणात हातून निसटून गेली. ही हृदयद्रावक घटना पंढरपुरातील इंजिनीअर शुभम भोसलेची आहे.

शुभम पहिल्यापासून हुशार म्हणून शाळेत ओळखला जायचा. घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं लहानपणापासून तो वडिलांना घरोघरी पेपर टाकण्यात मदत करायचा. वडील सोमनाथ भोसले हे पंढरपुरातील पेपर विक्रेते होते, त्यामुळे पहाटे चार वाजल्यापासून शुभमचा दिवस सुरु व्हायचा. वडिलांना मदत करत तो शिक्षण घेत होता. बारावीला चांगले गुण मिळाल्यानं त्याला कुठेही प्रवेश मिळू शकत असताना, घराच्या परिस्थितीची जाणीव ठेवत पंढरपूर इथल्या स्वेरी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. काॅम्प्युटर इंजिनीअरिंगची पदवी चांगल्या गुणांनी मिळवली. या गुणांच्या जोरावर त्याला कोलकाता इथे टीसीएस या बड्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली.

आता भोसले कुटुंबाचे चांगले दिवस येण्याची वेळ आली होती. कोरोनाच्या संकटामध्ये शुभम घरातूनच कंपनीचं काम करत होता. काही दिवसांपूर्वी त्याचा विवाह निश्चित होऊन साखरपुडाही झाला. आता सगळं चांगलं होणार या स्वप्नात सोमनाथ भोसले आणि त्याचे कुटुंब असतानाच, चार-पाच दिवसांपूर्वी शुभमला कोरोनाची लक्षणं जाणवू लागली. पहिल्यांदा पंढरपूरात उपचार केले, त्रास वाढू लागल्यानं त्याला सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र काल सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, आपल्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवणारा अवघ्या 24 वर्षाचा शुभम अर्ध्यावरच वाट सोडून निघून गेला. ज्या मुलाच्या भविष्यासाठी वडील सोमनाथ भोसले यांनी घाम गाळला, त्यांना चांगले दिवस दिसू लागताच काळानं घाला घातला. शुभमच्या मृत्यूनं भोसले कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

थोडक्यात बातम्या

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण!

उद्या बहिणीचं लग्न, आज भावाचा दुर्दैवी मृत्यू; इचलकरंजीतील हृदयद्रावक घटना

लस घ्याच! लसीकरणानंतर मृत्यूचं प्रमाण केवळ 0.00005 टक्के

‘…तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागेल’; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या टीकेला आदित्य ठाकरे यांचं सडेतोड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More