बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगाणिस्तानात भयावह परिस्थिती! पोटाची खळगी भरण्यासाठी पोटच्या पोरीला विकलं

काबूल | काही दिवसांमध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानमधील सैन्य मागे घेतल्याने अफगाणिस्तानात तालिबान्यांनी वर्चस्व मिळवलं आहे. तेव्हापासून तेथील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. लोकांच्या दररोजच्या खाण्यापिण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोटची भूक भागवण्यासाठी महिलांना पोटची मुले विकावी लागत आहेत.

काबूलमध्ये राहणाऱ्या एका महिलेने इतर अतत्यांची भूक भागवण्याकरिता एक नवजात अपत्य 500 अमेरिकन डॉलरला विकल्याची अत्यंत ह्रदयद्रावक माहिती समोर येत आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये ताबा मिळवल्यापासून परिस्थिती खूप भयावह आहे.

आपल्या पोटच्या मुलीला विकावं लागत असल्याने महिलेने तिच्या क्लेषकारक भावना व्यक्त केल्या आहेत. दोन वेळेसचं पोटभर अन्नही मिळत नव्हतं. अशा परिस्थितीत इतर मुलांचे पोट भरण्यासाठी नवजात मुलीला विकावं लागलं आहे. यामधून जे काही पैसे आले आहेत पुढील काही दिवस कुटूंबाचं पोट भरणार आहे. या महिलेने मुलीला अवघ्या 37 हजारांमध्ये विकले आहे.

दरम्यान, या महिलेचे पती कचरा गोळा करायचं काम करतात, असे संबंधित महिलेने सांगितलं आहे. माझी बाकीची मुलं उपाशी होती. त्यामुळे मला माझ्या मुलीला विकावं लागलं. मुलीला विकल्याचं मला खुप दु:ख आहे. आमच्या घरात ना तेल आहे ना पीठ आहे. दोन वेळेसचं अन्न मिळण कठीण झालं होतं. माझ्या मुलीचं भविष्य काय असेल मला माहित नाही, आमच्याबद्दल काय वाटेल हेही सांगता येत नाही. परंतु, नाईलाजास्तव मला हा निर्णय घ्यावा लागला. एकंदरीतच आफिगाणिस्तानमध्ये तालिबानी राज आल्यानंतर परिस्थिती प्रचंड भयंकर आहे.

थोडक्यात बातम्या- 

“पाच वर्षात तुम्ही किती काळ परदेशात राहिलात याचा हिशोब द्या”

‘तो एक तेजस्वी तारा होता’; अभिनेता पुनीत राजकुमारच्या निधनानंतर सिनेसृष्टी हळहळली

“नवाब मलिक बोलतात ती वस्तुस्थिती असेल तर…”

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाचा अनिल देशमुखांना दणका

आर्यन खानची आज आर्थर रोड जेलमधून सुटका होणार का? वकिल मानेशिंदे म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More