बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मन हेलावून टाकणारा फोटो; कोरोना मुक्त झालेल्या आजींनी डॉक्टरांना मारली मीठी

नवी दिल्ली | देशभरात सध्या कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. गेल्या वर्षभरापासून सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी कोरोना योद्धे बनून परिस्थितीसोबत लढत आहेत. अशात एका डॉक्टर आणि पेशंटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोरोनातून बरं झाल्यानंतर 75 वर्षीय आजींनी डॉक्टरांना मिठी मारली आहे. व्हायरल झालेल्या या फोटोत एका वयस्कर महिलेनं डॉक्टरांना मिठी मारली आहे. या डॉक्टरांचं नाव डॉ. अभिशिक्ता मुळीक आहे. कोलकात्यातील रुग्णालयातील हा फोटो समोर आला आहे.

अनेकांनी या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं डॉक्टरर्स आपल्याला सुरक्षा देण्यासाठी आहेत. तसंच आपल्याला देव नाही तर डॉक्टर वाचवत आहेत, असं म्हटलं आहे.

दरम्यान, काहीदिवसांपूर्वी एका नर्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये नर्स एका महिलेला जेवण भरवत असल्याचं पहायला मिळालं. कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. यात डाॅक्टर, पोलीस, पत्रकार यांचाही समावेश आहे. मात्र डाॅक्टर, पोलीस, पत्रकार असे अनेक लोक आपल्या कामाला प्रथम स्थान देत आहेत.

 

थोडक्यात बातम्या- 

“अमित शहांमध्ये खूप मग्रुरी दिसत होती, ते आकाशात उडत होते”

भटजीला थोबाडीत मारुन लग्न थांबवणं पडलं महागात, जिल्हाधिकाऱ्याला पदावरुन हटवलं

निवडणुका संपल्या! आता मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

मुलांच्या खेळण्यावरुन दोन कुटुंबातील भांडणाने गाठलं टोक; घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

‘त्या पक्षाला उघडं करण्याचं काम भाजप करणार’, अदर पूनावाला प्रकरणात आशिष शेलार यांचा गौप्यस्फोट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More