बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हृदयस्पर्शी! तहानलेल्या कुत्र्याला त्याने ओंजळीने पाणी पाजलं, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. रोज काही ना काही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं पाहायला मिळत असतं. यातील काही व्हिडीओ सहज मन जिंकून जातात. अशातच सध्या व्हायरल होणारा व्हिडीओही असाच काहीसा आहे.

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका तहानलेल्या कुत्र्याचा आहे. व्हिडीओमध्ये एक तहानलेला कुत्रा दिसत आहे. पाणी पिण्यासाठी धडपड करत तो नळाजवळ येऊन थांबला आहे. कुत्र्याची पाणी पिण्यासाठीची धडपड बाजूला उभे असलेल्या एका माणसानं पाहिली आणि त्या माणसानं कुत्र्याला आपल्या हातानं पाणी पाजलं.

आपल्या ओंजळीत पाणी घेत माणसानं कुत्र्याची तहान भागवली. खूप तहान लागल्यामुळे ओंजळीतील पाणी संपल्यावर कुत्रा माणसाला आणखी पाण्याची मागणी करताना दिसत आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. अनेकांनी कमेंट करत यावर भावूक प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अजूनही माणूसकी जिवंत असल्याचं यातून पाहायला मिळत आहे. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात.

 

थोडक्यात बातम्या – 

एलआयसीच्या ‘या’ स्कीममध्ये एकदाच पैसे भरा अन् महिन्याला मिळवा ‘इतक्या’ हजारांची पेन्शन

काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये तुफान हाणामारी; भाजप खासदाराला कपडे फाटेपर्यंत मारलं, पाहा व्हिडीओ

बसल्या बसल्या त्याने चोरी करुन पळणाऱ्या चोराला पकडलं, पाहा व्हिडीओ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, अमित शहा यांनी बैठक बोलावली

कोणताही क्लास न लावता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशवंतने UPSC केली क्रॅक!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More