बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना काळात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या डाॅक्टर्सला व्हिडीओच्या माध्यमातून ‘मनापासून साॅरी’, पाहा व्हिडीओ

पुणे | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातलंय. देशाच्या विविध भागात कोरोनाने हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था डगमगताना दिसत आहे. या संकटकाळात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या डाॅक्टरांंसाठी पुण्यातील काही तरुणांनी मिळून एक व्हिडीओ बनवला आहे.

व्हिडीओच्या माध्यमातून तरुणांनी डॉक्टरांना ‘धन्यवाद’ आणि ‘सॉरी’ म्हणण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. कोरोनाकाळात रात्रंदिवस मेहनत घेणारे डाॅक्टर्स रुग्णांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्या या कष्टाचे पांग आपण त्यांच्यावर हल्ले करून, त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन फेडत आहोत, असं काहीसं चित्र अनेक ठिकाणी दिसून आलंय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल 244 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. मात्र आपण फारसं त्याकडे लक्ष दिलं नाही. मात्र त्या डॉक्टरांचंही कुटुंब आहे, हा विचार आपल्या मनात आलाच नसावा. असं व्हिडीओच्या माध्यमातून मांडण्यात आलं आहे.

पुढे, अशा परिस्थितीत डॉक्टर्स किती हतबल झालेले आहेत, हे आपण अनेक फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून बघितलं आहे. आपल्या घरच्यांना संसर्ग होऊ नये म्हणून अनेक डॉक्टर त्यांच्या घरापासून लांब आहेत. आपल्या विनाकारण फिरण्यानं आरोग्य यंत्रणेवर ताण येतो आणि त्याचा त्रास मात्र डॉक्टरांना होतो हा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असंही व्हिडीओच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, या व्हिडीओचं संकलन सायली अयाचित हिनं केलं आहे. याचं लेखन रत्नदिप शिंदे यानं केलं असून वाचन संदेश पवार यानं केलं आहे. देवेंद्र चरणकर, जयवर्धन खोत, कुणाल शर्मा, समृद्धी देशपांडे, अभिषेक देशपांडे, शुभंकर वाघोले, यशराज आवेकर, अजिंक्य कुलकर्णी यांनी या व्हिडीओसाठी खास मेहनत घेतली आहे.

पाहा व्हिडीओ – 

थोडक्यात बातम्या – 

सेल्फीसाठी काहीही! आवडत्या अभिनेत्यासोबत फोटो काढण्यासाठी महिलेने मारले चक्क साडीतच पुशअप्स, पाहा व्हिडीओ

धक्कादायक! कोरोनापासून वाचण्याचा उपाय सांगत त्यानं खाल्ला साप अन्…..

आयपीएलमधील ‘या’ विस्फोटक खेळाडूवर पुण्यात विनामास्कची कारवाई, भरावी लागली 500ची पावती

महाराष्ट्रात नवीन कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट, राज्याचा रिकव्हरी रेट 93.24 टक्यांवर

‘…तर नवा पक्षही स्थापन करू’; खासदार संभाजीराजे भासलेंचंं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More