Heat Stroke | राज्यात बऱ्याच ठिकाणी तापमान आता चाळीशीच्याही पार गेलं आहे. विदर्भामध्ये तर उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. येथे 47 पेक्षाही अधिक तापमान नोंदवलं गेलंय. अजून 31 मे पर्यंत ऊन आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय.
अशात नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय. देशभरात उष्माघातामुळे आतापर्यंत 60 पेक्षा अधिक जणांनी आपला जीव गमावला आहे. ही संख्या अजूनही वाढतच चालली आहे.
या लेखात तुम्हाला उष्माघातापासून बचाव कसा करायचा, त्याची लक्षणे काय? याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे. यात दिलेले उपाय तुम्हाला (Heat Stroke ) नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. घराबाहेर पडताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत काही सूचना या लेखात करण्यात आल्या आहेत.
उष्माघाताची लक्षणे कोणती?
उष्माघात झाल्यास अनेकदा कूलिंग तंत्र वापरले जाते. थंड जागी बसून भरपूर पाणी पिण्याचा सल्ला अनेकदा उष्माघातावर उपचार (Heat Stroke )म्हणून दिला जातो, उष्माघातात व्यक्तीची स्थिती स्थिर करण्यासाठी तात्काळ वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते.
उष्माघाताच्या लक्षणांबद्दल बोलायचं झालं तर, बऱ्याचदा यामुळे व्यक्तीची स्थिती गंभीर बनू शकते. सुरुवातीला प्रचंड घाम येणे आणि अशक्तपणा ही लक्षणे दिसून येतात. उष्माघात वाढू नये म्हणून त्वरित उपाय करावा. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास ताबडतोब वैद्यकीय उपचार घ्यावेत.
उष्माघाताची कारणे कोणती?
उन्हात अधिक वेळ काम करणे किंवा उन्हाळ्यात इतर मजुरीची कामे करणे.
कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, काचेच्या कारखान्यात काम करणे.
उच्च तापमान खोलीत काम करणे.
यासोबतच खूप डार्क आणि घट्ट कपडे घातल्याने उष्णता अधिक जाणवते.
‘असा’ करा उष्माघातापासून बचाव
उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी पिऊन हायड्रेटेड राहा, हलके आणि श्वास घेण्यासारखे कपडे घाला, उष्णतेच्या वेळी (Heat Stroke )अधिक शारीरिक हालचाली टाळा, थंड ठिकाणी विश्रांती घ्या आणि शरीर थंड ठेवा. पंखे किंवा वातानुकूल वातावरणात राहा. सीझन फ्रुट्स म्हणजेच संत्री, मोसंबी, टरबूज अधिक खा. काकडीचे सेवन करा. डिटॉक्स वॉटर म्हणजेच पुदिना, लिंबू, अद्रक पाण्यात टाकून ते पाणी प्या. यामुळे तुमचे शरीर थंड राहील.या उपायांनी तुम्ही उष्माघात होण्यापासून स्वतःचा बचाव करू शकता.
News Title – Heat Stroke Prevention
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! अग्रवाल पिता-पुत्राला ‘इतके’ दिवस पोलिस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
अजित पवारांना मोठा धक्का; ‘त्या’ घोटाळ्याची राज्य सरकारकडून पुन्हा चौकशी सुरू
“शरद पवारांना शिवसेना संपवायचीये”, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Hrithik Roshan सोबत पुन्हा रोमांन्स करणार अमिषा पटेल?; स्वत:च केला मोठा खुलासा