मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठी वाढ होत आहे. वाढणाऱ्या उष्णतेचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यातच आता उन्हाळा आणखी तीव्र होताना दिसत आहे. मराठवाडा आणि विदर्भाला कडक उन्हाळ्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता उष्णतेची तीव्र लाट धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अनेक लोकांना उष्माघाताच्या समस्या जाणवत आहेत. जळगावातील एका शेतकऱ्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. राज्यात उन्हात कधी ढगाळ वातावरण तर कधी अवकाळी पाऊस पडतो. विदर्भ आणि मराठवाड्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उष्ण प्रदेशामध्ये वारा वाहन्यातील खंडनामुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाकडून अहमदनगर, बुलडाणा, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमान 44 अंश सेल्सियस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांमध्ये महाराष्ट्रात भारतीय हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावं, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. येत्या काही दिवसांतच किमान आणि कमाल तापमानात घट होण्याची देखील शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
“जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी… तेणे पत्थ्य सांभाळावी”, मोदींना खोचक टोला
“गली गली में शोर है, भाजपवाले चोर है”, दरेकरांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
“नीरव मोदींच्या बंगल्याप्रमाणे नारायण राणेंचा अधीश पाडा”, प्रकरण सुप्रीम कोर्टात
सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडणार, 1 एप्रिलपासून होणार ‘हे’ मोठे बदल
महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ, 25 पेक्षा जास्त आमदारांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल
Comments are closed.