सोलापूर | सोलापूर (Solapur) शहरात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचा पारा चाळीसजवळ पोहोचला आहे. त्यामुळे सोलापूरकरांच्या अंगाची लाईलाई होताना दिसत आहे. यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाचा रेकॉर्ड मोडला आहे.
सोलापूर (Solapur) शहरात दुपारी सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येतो. रात्रीच्या वेळी सुटणारी थंडीही कमी झाली आहे. मंगळवारी सोलापूर (Solapur) शहरात 39.9 तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
मे महिन्यातील उन्हाच्या चटक्यांसारखे चटके एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच लोकांच्या अंगाला बसत आहेत. सोलापुरात उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी गाठली आहे. हंगामातील सर्वोच्च तापमानाचा रेकॉर्ड मोडला आहे.
दरम्यान, किमान तापमान हे 22.4 एवढे नोंदवण्यात आलं आहे. वाढत्या तापमानामुळे सोलापूरकर घामाघुम झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
- कोरोनाने पुन्हा टेंशन वाढवलं; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा मास्कची सक्ती
- छापेमारीतून ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेचा एकूण आकडा वाचून थक्क व्हाल!
- ‘या’ कार्सचा बाजारात जलवा, विक्रीचे तोडले सर्व रेकॉर्ड
- ‘तुमचे पोलीस 24 तास घरी बसवा मग…’; राऊतांचा शिंदेंना इशारा
- “मोदी हेच सूर्य, चंद्र, धुमकेतू, शीतल चांदणं, माझा श्वासही मोदींमुळेच”