मुंबई | पुण्या-मुंबईतील लोकं सध्या कोरोनाच्या भीतीने गावाकडे गेले आहेत. मात्र गावातील नागरिकांनी त्यांच्याकडे संशयाने पाहू नये, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं.
या भयंकर संकटाचा सामना आपण सगळ्यांनी करायचा आहे. गावात येणाऱ्या लोकांना अडवू नका, असं आवाहनही यावेळी त्यांनी गावाकडच्या लोकांना केलं. कोरोनाचे रूग्ण बरे होत आहेत ही खूपच दिलासादायक गोष्ट आहे. त्यामुळे काळजी करू नये मात्र काळजी घ्या, असं ते म्हणाले.
अनेक ठिकाणी डॉक्टरांनी ओपीडी बंद केल्या आहेत. असं कृत्य करणं योग्य नाही. संचारबंदीतही आरोग्य सेवांना सूट दिलेली आहे. लोक आजारी पडले तर त्यांनी काय करायचं? त्यामुळे ओपीडी बंद करु नका, अशी विनंतीही राजेश टोपे यांनी केली.
दरम्यान, बुधवारी गुडीपाडवा आहे. हा दिवस म्हणजे संकल्प करण्याचा दिवस असतो. त्यामुळे बुधवारी घरी बसून आपण संकल्प करूया आणि कोरोनाला हरवूया, असं आवाहनही त्यांनी राज्यातील जनतेला केलं.
ट्रेंडिंग बातम्या-
महाराष्ट्राला दुसरं मोठं यश; मुंबईतील 12 रुग्ण कोरोनामुक्त
“…तर देशातील कोरोनाग्रस्तांचा अपेक्षित आकडा 62 टक्क्यांनी कमी होईल”
महत्वाच्या बातम्या-
उद्धव ठाकरेंचा संयमीपणा… राज्यातील नागरिक, पोलिस तसंच केंद्र शासनाचे मानले आभार!
‘गो करोनिया गो’…. पाहा विनोदवीर कुशल बद्रिकेचं भन्नाट गाणं
कोरोनानंतर चीनमध्ये आला हंता विषाणू; एकाचा मृत्यू, 32 जणांची चाचणी
Comments are closed.