बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील ‘या’ भागात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा!

मुंबई | जवळपास 20 दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आज वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी, विभागांसाठी अ‍लर्ट जारी केला आहे. 12 ते 15 जुलैदरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात अतिवृष्टी होईल, तर मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 12 जुलै रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल.

13 जुलै रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 14 जुलै रोजी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र पुढच्या दोन दिवसांत अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवून हवामान खात्याने संपूर्ण कोकण परिसरासाठी ‘रेड अ‍लर्ट’ जारी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या ‘त्या’ वक्तव्याला शरद पवारांचा पाठिंबा, म्हणाले…

देशात मंत्र्यांची संख्या वाढली, पण कोरोना लसीची नाही- राहुल गांधी

शाळा सुरू करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा गंभीर इशारा, म्हणाले…

“रोहित पवार एक दिवस मतदारसंघात येतात आणि 10-15 फोटो काढून जातात”

पुण्यातील कोरोना आला आटोक्यात; पाहा आजची दिलासादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More