Top News महाराष्ट्र मुंबई

येत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ शहरात मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज

संग्रहित फोटो

मुंबई | रविवारी सकाळपासून विश्रांती न घेता पावसाने मुंबईकरांना झोडपून काढलं आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणीही साचलं होतं. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झालेला आढळून आला. मात्र येत्या 24 तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये सर्वसाधारण ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय.

कुलाब्यातील प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या चोवीस तासांमध्ये शहरातील कमाल तापमान 27 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या काळात साधारण हवामान राहणार असून महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारी भागात हवेचा वेग ताशी 50 ते 60 किमी इतका असणार आहे.

येत्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. तसंच मुंबईकरांना कारण नसताना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिलाय.. त्याचसोबत मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली असून समुद्र किनारी न जाण्याचं आवाहनही मुंबईकरांना करण्यात आले आहे.

रविवारी सकाळी ८ वाजल्यापासूनच पावसाने पुन्हा एकदा मुंबई-ठाण्यात जोर धरला. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे अवघ्या तासाभरातच मुंबईतील सखल भागात पाणी भरलं होतं.

ट्रेंडिंग बातम्या-

‘आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘; देवेंद्र फडणवीस यांचं आणखी एक पुस्तक प्रकाशित

आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला 10,000 लोक; तीन गावं करावी लागली सील

महत्वाच्या बातम्या-

एकतर्फी प्रेमातून नववधूची लग्नाच्याच दिवशी हत्या, ब्यूटी पार्लरमध्ये घुसून चिरला गळा

106 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात, ठणठणीत होऊन परतले घरी

संजय राऊतांनी 12 आमदारांची नव्हे तर महाराष्ट्राची काळजी करावी- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या