मुंबई | राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. कोकणासह संपुर्ण महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई नगरीला तर पाऊस अक्षरश: झोडपून काढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मुंबईत रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी समुद्र किनाऱ्यावर जाण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. सकाळी 6 ते 10 या वेळेतच चौपाटीवर जाता येईल. त्यांनतर दिवसभर चौपाटीवर फिरण्यास सक्त मनाई आहे.
या वर्षीच्या मान्सूनमध्ये आता पर्यंत 10 जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. यामुळेच महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून मनाई करुन देखील मुंबईकर आणि पर्यटक किनाऱ्यावर फिरायला जातात. समुद्रात पोहायला उतरतात. त्यामुळे रेड आणि ऑरेंज अलर्टच्यावेळी या गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे.
मुंबईला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईत 7 आणि 8 जुलै रोजी अतिवृष्टीचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले होते. त्यामुळे मुंबईकर हवालदिल झाले होते. अंधेरी, घाटकोपर, चेंबुर, धारावी, वडाळा पनवेल आणि दादर येथे पाणी साचले होते.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि प. महाराष्ट्रात खबरदारीसाठी 15 एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
थोडक्यात बातम्या –
काय ते झाडी, काय ते डोंगर; पावसाळ्यात फिरण्यासाठी पुण्यातील ‘या’ जागा एकदम ओक्के
‘मी एक दिवस कपडेच घालणार नाही म्हणजे…’, उर्फी जावेदच्या बोल्ड वक्तव्याने खळबळ
कोरोनाच्या ‘या’ दिर्घकाळ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष
उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के! ठाण्यानंतर आता नवी मुंबईतील नगरसेवक शिंदे गटात जाणार?
बसा बसा म्हणत फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवलं, पाहा व्हिडीओ
Comments are closed.