मुंबई | गेल्या तीन चार दिवस संपुर्ण राज्यात पावसाचा हैदोस सुरु आहे. पावसाने नागरिकांची आणि प्रशासनाची झोप उडवली आहे. राज्यातील 7 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर साठी प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे.
तसेच मराठवाडा आणि विदर्भासाठी दिलासादायक वृत्त आहे. मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच राज्यातील सर्व नदिकाठच्या नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच या वर्षी आतापर्यंत 10 नागरीकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला असल्याने प्रशासनाने समुद्र किनाऱ्यावर फिरण्यास मज्जाव केला आहे. सकाळी 6 ते 10 या वेेळेतच समुद्र किनाऱ्यावर फिरता येईल.
हवामान खात्याकडून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील तीन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. तसेच एनडीआरएफच्या 15 तुकड्या सतर्कतेसाठी तैनात केल्या आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट बंद ठेवला आहे. घाटात धोकादायक दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. येत्या काही काळात पावसाची दमदार हजेरी होणार असल्याने प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आलं आहे.
थोडक्यात बातम्या –
किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त ट्विट, शिंदे गटाच्या आमदारांना राग अनावर
मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय
शहाजीबापू पाटलांवर मोठं संकट, थोडक्यात बचावले; वाचा सविस्तर
काय ते झाडी, काय ते डोंगर; पावसाळ्यात फिरण्यासाठी पुण्यातील ‘या’ जागा एकदम ओक्के
‘मी एक दिवस कपडेच घालणार नाही म्हणजे…’, उर्फी जावेदच्या बोल्ड वक्तव्याने खळबळ
Comments are closed.